१०० हून अधिक पक्वान्ने, ३ लाख रसगुल्ले, ५० क्विंटल नॉनव्हेज, माजी खासदाराच्या लेकीच्या लग्नात शाही मेजवानी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:44 PM2023-02-15T12:44:43+5:302023-02-15T12:45:09+5:30
Marriage News: बिहारमधील माजी खासदार आणि बाहुबली नेते आनंद मोहन यांची मुलगी सुरभी आनंद हिचा विवाह आज होत आहे. या विवाह सोहळ्यासाठी भव्य तयारी केली जात आहे.
बिहारमधील माजी खासदार आणि बाहुबली नेते आनंद मोहन यांची मुलगी सुरभी आनंद हिचा विवाह आज होत आहे. या विवाह सोहळ्यासाठी भव्य तयारी केली जात आहे. या विवाह सोहळ्यामध्ये सजावटीपासून भोजनापर्यंत सगळ्याची जोरदार व्यवस्था करण्यात आली आहे. भोजनामध्ये नॉनव्हेजसह १०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्ने बनवण्यात येत आहेत. त्यामध्ये सुमारे ५०० क्विंटल नॉनव्हेज बनवण्यात येत आहे.
यामध्ये सुमारे २५ क्विंटल मटन, १५ क्विंटल चिकन आणि १० क्विंटल मासे शिजवण्यात येत आहेत. मात्र वऱ्हाडी मंडळी नॉनव्हेज खाणार नाहीत. याबाबतची माहिती देताना शुभम आनंद यांनी सांगितले की, सर्व वऱ्हाडी मंडळी शाकाहारी आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी नॉनव्हेज वाढले जाणार नाही. वऱ्हाड्यांसाठी शाकाहारी भोजनाची व्यवस्था केली जात आहे. त्यामध्ये इंडियन आणि कॉन्टिनेन्टल पदार्थांचा समावेश असेल.
मिठाईमध्ये गुलाबजाम, रसगुल्ले, रसमलाई, इमरती, मूगडाळीचा हलवा यासह १० वेगवेगळे पदार्थ बनवले जात आहेत. सुमारे १५ हजार लोक या विवाह सोहळ्यात आनंद मोहन यांच्या बाजूने सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. धीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या समर्थकांसाठी सुमारे ५० क्विंटलहून अधिक नॉनव्हेज पदार्थ बनवले जात आहेत. तसेच स्टार्टरमध्ये चिकन आणि पनीर वाढले जाईल.
आनंद मोहन यांची कन्या सुरभी हिचा विवाह पाटणामधील बैरिया परिसरातील एका खाजगी फर्ममध्ये होत आहेत या विवाह सोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. बिहार सरकारमध्ये सहभागी अनेक मंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.