पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 08:18 PM2024-09-25T20:18:22+5:302024-09-25T20:26:52+5:30
पॅरासिटामॉल टॅब्लेट IP 500 mg, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड, उच्च रक्तदाबावरील औषध Telmisartan इत्यादींसह ५३ औषधे गुणवत्ता चाचणीत फेल झाली आहेत.
आपल्याला साधारण ताप आला तर आपण पॅरासिटामॉल ही गोळी घेतो. पण आता या गोळीबाबत एक महत्वाची बातमी आली आहे. ही गोळी गुणवत्तेच्या चाचणीत फेल झाली आहे. याशिवाय कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, अनेक मधुमेहविरोधी औषधांचाही या यादीत समावेश आहे. ही यादी भारतीय औषध नियामक सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली आहे.
ही यादी ऑगस्ट महिन्यासाठी आहे. ५० हून अधिक औषधे क्विलीटीच्या मानाने नसल्याचे म्हटले आहे. यापूर्वी जूनमध्येही अशीच एक यादी जाहीर करण्यात आली होती, यामध्ये पॅरासिटामॉलसह ५२ औषधांची नावे होती.
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
गुणवत्ता तपासणीसाठी दर महिन्याला वेगवेगळ्या राज्यांमधून औषधांचे नमुने घेतले जातात आणि नंतर त्यांची चाचणी केली जाते. व्हिटॅमिन सी आणि डी 3 गोळ्या शेलकल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटासिड पॅन-डी, पॅरासिटामोल गोळ्या IP 500 मिग्रॅ, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड, उच्च रक्तदाब औषध तेलमिसार्टन इत्यादींसह 53 औषधे आहेत,ही गुणवत्ता चाचणीत उत्तीर्ण झालेली नाहीत.
ही औषधे एल्कम हेल्थ सायन्स युनिट-2, मॅज लाईफसायन्सेस, मेसर्स प्युअर अँड क्युअर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स स्कॉट आदिल लिमिटेड यांसारख्या कंपन्यांद्वारे उत्पादित केली जातात. औषधांच्या उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तारीख, बॅच क्रमांक, उत्पादनाचे नाव इत्यादी तपशील सरकारी डेटामध्ये दिलेले आहेत. M/s कर्नाटक अँटिबायोटिक्स आणि फार्मा द्वारे उत्पादित पॅरासिटामॉल आयपी 500 mg गोळ्या देखील गुणवत्तेच्या चाचणीत अयशस्वी झाल्या आहेत.
याशिवाय, कोलकाता येथील औषध-चाचणी प्रयोगशाळेत अल्केम हेल्थ सायन्सचे प्रतिजैविक क्लेव्हम 625 आणि पॅन डी बनावट असल्याचे आढळले आहे. त्याच प्रयोगशाळेने हैदराबाद-आधारित Hetero's Sepodem XP 50 Dry Suspension ओळखले आहे.