दोन दिवसांत एक लाख कोटींहून अधिक उलाढाल; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा देश सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 06:59 AM2024-01-22T06:59:21+5:302024-01-22T06:59:30+5:30

अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा देश सज्ज झाला आहे.

More than one lakh crore turnover in two days | दोन दिवसांत एक लाख कोटींहून अधिक उलाढाल; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा देश सज्ज

दोन दिवसांत एक लाख कोटींहून अधिक उलाढाल; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा देश सज्ज

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा देश सज्ज झाला आहे. या क्षणाचा साक्षीदार होता आले याचे समाधान घराघरांत दिसून येत आहे. यानिमित्ताने बाजारातही जोरदार खरेदी केली जात आहे. प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा होण्याआधी विविध बाजारांमध्ये  एक लाख कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे. 

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कैट)  राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी देशभरात जोरदार खरेदी होईल, असा अंदाज आधीच व्यक्त केला होता. कैटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी सांगितले की, धार्मिक नेत्यांच्या आग्रहावरून व्यापाऱ्यांनी एक बैठक घेत देशभरातील बाजार राममय करून टाकण्याचा निर्णय घेतला होता. 

Web Title: More than one lakh crore turnover in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.