वीस लाखाहून अधिक नवे मतदार
By admin | Published: September 5, 2014 01:43 AM2014-09-05T01:43:58+5:302014-09-05T01:43:58+5:30
महाराष्ट्रात मतदार याद्या सुधारण्यासाठी घेतलेल्या विशेष मोहिमेत 2क् लाखांहून अधिक मतदारांनी नावे नोंदवली आहेत.
Next
नवी दिल्ली : महाराष्ट्रात मतदार याद्या सुधारण्यासाठी घेतलेल्या विशेष मोहिमेत 2क् लाखांहून अधिक मतदारांनी नावे नोंदवली आहेत. त्यात मुंबईतील 1.94 लाख तर पुण्यातील 2.66 लाख मतदारांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मुंबई व पुण्यात अनेक मतदारांची नावे गहाळ असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरून बराच वाद झाला होता. या पाश्र्वभूमीवर ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
मुंबई, ठाणो आणि पुणो येथील ज्या नागरिकांची नावे मतदार यादीतून गहाळ झाली होती, अशा 26 लाख लोकांना केंद्रीय निवडणूक आयोगाने फॉर्म सह पत्र स्पीड पोस्टने पाठविली होती. त्यापैकी 4.5 लाख पत्रे संबंधित व्यक्तींर्पयत पोहोचली. तर, पत्ता चुकीचा असल्याने वा संबंधित व्यक्ती तेथे राहत नसल्याने उर्वरित सर्व पत्रे आयोगाकडे परत आली. नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांमध्ये मुंबईतील 16 हजार 614 आणि पुण्यातील 27 हजार 542 मतदार असे आहेत, ज्यांची नावे पूर्वी याद्यांमध्ये होती, पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी ती गायब झाली होती, असे आयोगाने म्हटले आहे. ज्यांची नावे अजूनही मतदारयादीत नाहीत, अशांना राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेपासून 1क् दिवस आधी नाव नोंदविता येईल. 31 ऑगस्टर्पयत 1.32 लाख नवे अर्ज सादर झाले असून मतदार यादीत सुधारणा करण्याचे काम अद्याप सुरू आहे.
16 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर निवडणूक आयोगाने 9 ते 3क् जूनदरम्यान मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेतली होती. मतदार यादीतून नाव गहाळ झाले असले तरी, निवडणूक ओळखपत्र आहे, अशांना विशेष सवलत देण्यात आली होती. (विशेष प्रतिनिधी)
मोठी जाहिरात, उदंड प्रतिसाद
तब्बल 256 वृत्तपत्रे तसेच रेडिओ आणि दूरदर्शन तसेच खासगी वाहिन्यांवर जाहिरात देण्यात आली तसेच सिनेअभिनेता आमीर खान हाही यात सहभागी झाला होता. त्यामुळेच या विशेष मतदार नोंदणीस उदंड प्रतिसाद मिळाला, असे निवडणूक आयोगाने नमूद केले.