राज्यात अडीच हजारांहून अधिक रुग्ण, १८ मृत्यूंची नोंद, एकूण १८४ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 06:31 AM2020-04-15T06:31:23+5:302020-04-15T06:31:39+5:30

नव्या ३५० रुग्णांची भर, मुंबईत सर्वाधिक; २५९ जण बरे होऊन घरी परतले

More than two and a half thousand patients in the state, 18 deaths were recorded, a total of 184 corona | राज्यात अडीच हजारांहून अधिक रुग्ण, १८ मृत्यूंची नोंद, एकूण १८४ वर

राज्यात अडीच हजारांहून अधिक रुग्ण, १८ मृत्यूंची नोंद, एकूण १८४ वर

Next

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा अडीच हजारांहून अधिक झाला आहे. त्यामुळे राज्य शासनासमोर संसर्ग संक्रमण रोखण्याचे आव्हान गडद होते आहे. राज्यात मंगळवारी ३५० रुग्णांचे निदान झाले, यात सर्वाधिक रुग्ण २०४ मुंबईतील आहेत. यामुळे राज्याची रुग्णसंख्या २ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर मंगळवारी राज्यात १८ मृत्यूंची नोंद झाली, त्यातील ११ मुंबईत असून राज्याचा मृतांचा आकडा १७८ वर पोहोचला आहे. याखेरीज दिलासादायक म्हणजे राज्यात आजपर्यंत २५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात मंगळवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे ११, पुण्यातील ४ तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे.

जग : १.२४ लाख मृत्यू
जगभरात कोरोना बळींची एकूण संख्या १ लाख २४ हजारांवर गेली असून, अमेरिकेतील मृतांचा आकडाच २३ हजार ७०० आहे. जगातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९.७९ लाखांहून अधिक झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत २० हजार ५००, तर स्पेनमध्ये १८ हजारांहून अधिक जण मरण पावले आहेत. ब्रिटनमध्येही मृतांची संख्या १२ हजारांवर गेली आहे. तिथे ९३ हजार ८७३ जण बाधित आहेत. कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या १९ लाख ४७ हजार रुग्णांपैकी आतापर्यंत ४ लाख ६० हजार जण उपचारानंतर बरे झाले असून, १३ लाख ६५ हजार रुग्णांवर विविध देशांतील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यातील ५५ हजार रुग्णांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

देश : ११ हजार रुग्ण
गेल्या २४ तासांत १४६३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्याने देशातील रुग्णांची संख्या ११ हजार ४७६ झाली आहे. या २४ तासांत २९ जण मृत्युमुखी पडल्याने बळींचा आकडा ३७७ झाला आहे. आतापर्यंत सुमारे १२०० जण उपचारांमुळे बरे झाले आहेत आणि ९ हजार २७३ जणांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट, दिल्ली आणि तामिळनाडू या राज्यांत कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. देशभरात ६०२ इस्पितळे फक्त कोरोना रुग्णांसाठी राखीव आहेत. तिथे एकूण एक लाख सहा हजार ११९ ‘आयसोलेशन बेड’ व १२,०२४ ‘आयसीयू’ बेडची सोय केली आहे. आतापर्यंत २.३७लाख व्यक्तींच्या कोरोना चाचण्या आहेत. देशात ‘रॅपिड’ चाचण्यांसाठी ३७ लाख किट््स केव्हाही उपलब्ध आहेत.

Web Title: More than two and a half thousand patients in the state, 18 deaths were recorded, a total of 184 corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.