दोन लाखांपेक्षा अधिकचा व्यवहार रोखीने केल्यास होणार 100 टक्के दंड
By Admin | Published: March 21, 2017 06:57 PM2017-03-21T18:57:53+5:302017-03-21T19:06:14+5:30
काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकरने ठोस पावले उचलण्याची प्रक्रियेला गती दिली आहे. काळ्यापैशा विरोधाता आज केंद्र सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकरने ठोस पावले उचलण्याची प्रक्रियेला गती दिली आहे. काळ्या पैशा विरोधात आज केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सरकारने रोकड व्यवहारांची मर्यादा तीन लाखांहून दोन लाखांवर आणण्याची तयारी सुरू केली आहे. दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक रोख रकमेचा व्यवहार केल्यास 100 टक्के दंड भरावा लागणार आहे. रोख रक्कम स्वीकारणाऱ्या व्यक्तीला हा दंड भरावा लागणार आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रोखीच्या व्यवहारांना बंदी घातल्यास काळ्या पैशांना चाप बसेल, असा विश्वास सरकारला आहे. लोकसभेत आज सादर करण्यात आलेल्या वित्त संशोधन विधेयकात याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महसूल सचिव हसमुख अधियाऱ्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
एक फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात केंद्र सरकारने तीन लाख अथवा त्याहून अधिक रुपयांच्या रोख व्यवहारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता.