दहशतवादापेक्षा प्रेमाचे बळी अधिक

By admin | Published: April 3, 2017 04:58 AM2017-04-03T04:58:54+5:302017-04-03T04:58:54+5:30

सैराट चित्रपटात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आर्ची आणि परशाचा कसा बळी घेण्यात आला

More victims of love than terrorism | दहशतवादापेक्षा प्रेमाचे बळी अधिक

दहशतवादापेक्षा प्रेमाचे बळी अधिक

Next

नवी दिल्ली : सैराट चित्रपटात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या आर्ची आणि परशाचा कसा बळी घेण्यात आला, हे सर्र्वाना माहीत असेल. चित्रपटांत अशी दृश्ये अनेकदा पाहायला मिळतात. पण भारतामध्ये दहशतवादापेक्षा प्रेमप्रकरणांमुळे बळी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार २00१ ते २0१५ या १५ वर्षांमध्ये भारतात प्रेमप्रकरणांनी ३८ हजार ५८५ जणांचा बळी घेतला. देशात प्रेमप्रकरणातून दररोज ७ हत्या होतात, १४ जण आत्महत्या करतात आणि अपहरणाचे ४७ प्रकार घडतात. ही अपहरणे अर्थातच मुलींची असतात. सतत दहशतवादाच्या छायेत असलेल्या भारतात दरवर्षी शेकडो नागरिक मृत्युमुखी पडत असतात. पण प्रेमप्रकरणातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण त्याच्या सहापट आहे. प्रकाशित झालेल्या वृतानुसार २00१ ते २0१५ या काळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये २0 हजार भारतीय मरण पावले.
देशात गेल्या १५ वर्षांमध्ये २ लाख ६0 हजार अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. त्यातील तरुण मुली, अल्पवयीन मुली आणि महिला यांचे अपहरण प्रामुख्याने विवाहाच्या कारणास्तव झाले होते. प्रेमप्रकरणामधून होणाऱ्या आत्महत्यांमध्ये पश्चिम बंगाल हे राज्य सर्वांत पुढे आहे. तिथे गेल्या १५ वर्षांत १५ हजार जणांनी आत्महत्या केल्या. म्हणजे दरवर्षी सरासरी एक हजार जणांनी आत्महत्या केल्या, असे दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू व मध्य प्रदेश या पाच राज्यांत प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अधिक आहे. या राज्यांमध्ये गेल्या १५ वर्षांत ३ हजारांहून अधिक हत्या झाल्या.

Web Title: More victims of love than terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.