सकाळपासून रात्रीपर्यंत... चायनिजच !

By admin | Published: October 16, 2016 01:16 AM2016-10-16T01:16:17+5:302016-10-16T01:16:17+5:30

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते... अशा ओळी विंदा करंदीकर यांनी लिहून अजरामर करून ठेवल्यात... तशीच गत आपल्या आयुष्यात चायनिज वस्तूंची झाली आहे.

From morning to night ... Chinijch! | सकाळपासून रात्रीपर्यंत... चायनिजच !

सकाळपासून रात्रीपर्यंत... चायनिजच !

Next

- पवन देशपांडे, मुंबई

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते... अशा ओळी विंदा करंदीकर यांनी लिहून अजरामर करून ठेवल्यात...
तशीच गत आपल्या आयुष्यात चायनिज वस्तूंची झाली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत रोजच्या जगण्यात चिनी वस्तूंचा भडीमार झालेला आहे. सध्या चायनिज वस्तूंवर बॅन घालण्याची चर्चा जोरदार सुरू आहे पण हे थांबवायचे कसे? आपला दिनक्रमच बघा ना... टाळू शकतो का आपण या वस्तूंचा वापर?

- 20% एवढी मोठी आयातवाढ आपण एकमेव  चीनसोबतच्या व्यापरात नोंदवली आहे. गेल्या दोन वर्षांतील ही आयात आणि त्यात येणाऱ्या वस्तू आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनल्या आहेत.
- 61अब्ज डॉलर किमतीच्या मालाची चीनमधून आयात करतो.

- 09अब्ज डॉलर किमतीच्या मालाची चीनमध्ये निर्यात करतो

सकाळी
- आपल्या घरात वाजणारा गजर अन् ती घड्याळ कोणती? मेड इन चायना!!
- ब्रेकफास्ट वेळी आपण वापरतो त्यातली काही भांडी.
- फ्रेश व्हायला जातो तेव्हा ब्रश ठेवायचं रॅक, बाथरूमधल्या टाइल्स, तेथे अडकवायच्या खुंटी, शेव्हिंग किट, आधुनिक प्रकारचे नळ कोठून आलेले असतात?
- मेकअपसाठी वापरले जाणारे उत्पादनं, बूटांची पॉलिश.

आॅफिसकडे जायला निघतो
- तेव्हा कारमधील अ‍ॅक्सेसरीज, हातात घालतो ते घड्याळ, कारमधले स्पीकर, कीचेन, जीपीएस यंत्रणा असतात का ‘मेड इन इंडिया’?

आॅफिसमध्ये आल्यानंतर
- आॅफिसमधील स्टेशनरी, कम्पुटर/ लॅपटॉप, स्कॅनर्स, हेडसेट.
- मीटिंगरूमध्ये वापरले जाणारे कॅमेरे, टेलिफोन, प्रोजेक्टर्स, हेडफोन, टॅबलेट्स, मोबाइल नेटवर्कसाठी वापरले जाणारे उपकरणे, कॅमेरे कुठे तयार होतात?

घरी परतल्यानंतर
- घरी स्वच्छतेसाठी वापरली जाणारी साधने, डस्टबिन, टायलेट पेपर्स.
- व्यायामासाठी वापरले जाणारे उपकरणे.
- घरी वापरली जाणारी इस्त्री, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किरकोळ दुरुस्तीसाठी वापरले जाणारी साधणे, व्हॅक्यूम क्लिनर.
- लहान मुलांची खेळणी, बॉल, एलसीडी-एलईडी टीव्ही, टीव्हीचा रिमोट आणि सेट टॉप बॉक्स.
- घरात लावलेले दिवे, फॅन, फर्निचर, घरात भिंतीवर लावलेले घड्याळ, डिजिटल फोटो फ्रेम यापैकी बरेच काही चीनमध्ये तयार झालेले असते ना?

...आणि झोपताना!
नाइट लॅम्प्स, रूप फ्रेशनर, हीटर किंवा एअर कंडिशनर अशा वस्तू कोठून येतात?

Web Title: From morning to night ... Chinijch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.