गारपिटीचा बाराशे शेतकर्यांना फटका
By admin | Published: December 31, 2014 12:05 AM2014-12-31T00:05:54+5:302014-12-31T18:58:09+5:30
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्ातील कोपरगाव, राहाता आणि पारनेर तालुक्यातील ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, गारपिटीचा १ हजार २६५ शेतकर्यांना फटका बसला आहे़ सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक मदतीस हे शेतकरी पात्र होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़
अहमदनगर: अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता आणि पारनेर तालुक्यातील ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, गारपिटीचा १ हजार २६५ शेतकर्यांना फटका बसला आहे़ सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक मदतीस हे शेतकरी पात्र होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़
जिल्ह्यात ११ व १२ डिसेंबर रोजी अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली़ या गारपिटीमुळे तीन तालुक्यातील कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, मका, द्राक्ष, बोर, डाळिंब, चिकू आणि पपई, यासारखी पिके भुईसपाट झाली़ इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ त्यामुळे शासनाने गारपीटग्रस्त शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली़ गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाने मागविला आहे़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील १ हजार २६५ शेतकर्यांच्या ५१६ हेक्टरील पिकांचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे़ तर ५० टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्यांची संख्या ४ हजार २९७ इतकी आहे़ परंतु केवळ ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्यांनाच आर्थिक मदत मिळते, असा प्रशासनाचा अनुभव आहे़ त्यामुळे सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मदतीबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे़
़़़
अशी आहे आर्थिक मदत (प्रति हेक्टर)
जिरायती- १० हजार, बागायती- १५ हजार, फळबाग-२५ हजार
़़़
कुठे किती नुकसान
५० टक्केपेक्षा अधिक
कोपरगाव
बाधित क्षेत्र- ११७
शेतकरी- २७३
़़़
राहाता
बाधित क्षेत्र-३९९़५०
शेतकरी- ९९२
़़़
५० टक्केपेक्षा कमी
कोपरगाव
क्षेत्र-८७१़७१
शेतकरी-९६२
़़़़
राहाता
क्षेत्र-८१४़५०
शेतकरी-२६७
़़़
पारनेर
क्षेत्र-१९०४
शेतकरी-३०६८