तुर्कीत मोदींना मोसाद व MI5 चे सुरक्षा कवच ?

By admin | Published: November 15, 2015 12:00 PM2015-11-15T12:00:35+5:302015-11-15T12:05:23+5:30

जी - २० परिषदेसाठी तुर्कस्तानमध्ये दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुर्कीतील गुप्तचर यंत्रणा मोसाद आणि ब्रिटनमधील गुप्तचर यंत्रणा एमआय ५ चे सुरक्षा कवच मिळणार आहे.

Mosaad and MI5 security cover in Turkey? | तुर्कीत मोदींना मोसाद व MI5 चे सुरक्षा कवच ?

तुर्कीत मोदींना मोसाद व MI5 चे सुरक्षा कवच ?

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १५ - तुर्कस्तानमध्ये झालेले बॉम्बस्फोट व पॅरिसमधील दहशतावी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जी - २० परिषदेसाठी तुर्कस्तानमध्ये दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुर्कीतील गुप्तचर यंत्रणा मोसाद आणि ब्रिटनमधील गुप्तचर यंत्रणा एमआय ५ चे सुरक्षा कवच मिळणार आहे. भारतीय अधिकारी व संबंधीत यंत्रणांमध्ये यासंदर्भात चर्चा झाल्याचेही समजते. 

तुर्कस्तानमधील अंकारा येथे ऑक्टोबरमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. तर शुक्रवारी पॅरिसमध्येही दहशतवादी हल्ला झाला होता. तुर्कस्तानमध्ये आज जी - २० परिषद होणार असून या परिषदेत सुमारे १२ हजार निमंत्रीत उपस्थित राहणार आहेत. या परिषदेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट असून भारतीय गुप्तचर यंत्रणांनीही नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी नवीन योजना आखल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून यामध्ये मोसाद व एमआय 5 चे एजंटही सहभागी असतील असे वृत्तात म्हटले आहे. हवाई किंवा अन्य मार्गांनी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने भारतीय गुप्तचर यंत्रणेनेही कमालीची सतर्कता बाळगली आहे. आपातकालीन स्थितीसाठी तुर्कीत एक अतिरिक्त विमान पाठवण्यात आले असून यामध्ये अत्याधुनिक रडार यंत्रणा व अन्य सुविधा उपलब्ध आहेत. परदेशी गुप्तचर यंत्रणा व भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी एकत्र काम करुन मोदींना अभेद्य सुरक्षा कवच देतील. तुर्कस्तान व सिरीयातील एजंटही अंकालामध्ये तैनात असतील. सर्व एजंटशी संपर्क साधण्यासाठी एक कंट्रोल रुमची स्थापनाही करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल व गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी या सुरक्षेचा आढावाही घेतला आहे. 

Web Title: Mosaad and MI5 security cover in Turkey?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.