मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 04:45 PM2024-09-19T16:45:07+5:302024-09-19T16:45:31+5:30

मोसादने तैवानच्या कंपनीला हाताशी धरून छोट्याशा पेजर आणि वॉकीटॉकीमध्ये काही ग्रॅम स्फोटक वस्तू ठेवून लेबनानमध्ये हजारो बॉम्बस्फोट केले आहेत.

Mossad will also be watching... No missile, no bomb, DRDO started working; Weapons of deadly energy waves were brought into hand | मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार

मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार

जगात सध्या सगळीकडे इस्रायलच्या मोसादची चर्चा आहे. त्यांनी तैवानच्या कंपनीला हाताशी धरून छोट्याशा पेजर आणि वॉकीटॉकीमध्ये काही ग्रॅम स्फोटक वस्तू ठेवून लेबनानमध्ये हजारो बॉम्बस्फोट केले आहेत. हिजबुल्लाहच्या हजारो दहशतवाद्यांना एकाचवेळी मारण्यासाठी मोसादने खतरनाक प्लॅन अंमलात आणला आहे. अशातच डीआरडीओ देखील असेच काहीसे शस्त्र बनविण्याच्या तयारीला लागले आहे. 

डीआयडीओला या वर्षाच्या अखेरील हवाई दलासाठी एक असे शस्त्र निर्माण करत आहे ज्यामध्ये कोणतेही स्फोटक पदार्थ वापरले जाणार नाहीत. परंतू, त्याचा वार एवढा अचूक असेल की स्फोटकेही ते करू शकणार नाहीत. डीआरडीओने AEW&C-KI ही यंत्रणा विकसित केली आहे. यासाठी अंतिम मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहे. या खतरनाक शस्त्राला नेत्र असे नाव दिले आहे. 

या नेत्रचा वापर शत्रूची विमाने आणइ युएव्ही ड्रोन ओळखणे, त्यांना ट्रॅक करणे यासाठी केला जातो. यानंतर ती विमाने लेझर लाईट सारख्या प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या एका एनर्जी बॉम्बने उडविता येतात. इंडियन एक्सप्रेसनुसार हवाई दल सध्या अशा दोन यंत्रांचा वापर करत आहे. हे शस्त्र अँटी ड्रोन हाय पावर मायक्रोवेव्ह सिस्टीमवर काम करते. याची रेंज १ किमीपर्यंत आहे. 

याचबरोबर डीआरडीओ ३० किलोवॉटच्या डायरेक्ट एनर्जी वेपन सिस्टीम तयार करण्याच्या कामाला लागली आहे. याद्वारे हवेतील वस्तू लक्ष्य केल्या जाऊ शकतात. याची टेस्टिंग आणि वापर जगातील काही अद्ययावत देशांचे सैन्य करत आहे. युक्रेन युद्धात ड्रोन सर्वात खतरनाक म्हणून उदयास आले आहेत. या ड्रोनना हवेतच उडविण्यासाठी डीआरडीओ यावर काम करत आहे. यामध्ये काँन्सट्रेटेड इलेक्ट्रोमॅग्नेटीक एनर्जीचा वापर करण्यात आला आहे. यासाठी लेझर, मायक्रोवेव्ह आदी टेक्निकचा वापर करण्यात आला आहे. 
 

Web Title: Mossad will also be watching... No missile, no bomb, DRDO started working; Weapons of deadly energy waves were brought into hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.