महाराष्ट्रात ज्येष्ठांवर सर्वाधिक अत्याचार; सर्व राज्यांनी टोलफ्री क्रमांक सुरू करावेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 12:40 AM2018-08-02T00:40:08+5:302018-08-02T00:41:02+5:30
महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत सातत्याने वाढत असून, वृद्धांच्या मदतीसाठी सर्व राज्यांनी टोलफ्री क्रमांक सुरू करावेत, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत सातत्याने वाढत असून, वृद्धांच्या मदतीसाठी सर्व राज्यांनी टोलफ्री क्रमांक सुरू करावेत, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत.
राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात वृद्धांवरील अत्याचार, गुन्हेगारीची प्रकरणे सर्वांत जास्त दाखल होतात. दरवर्षी यात वाढ होत आहे. राज्यात २०१४मध्ये राज्यात अशी ३९८१ झाली, तर २०१५मध्ये ही संख्या ४५६१ वर गेली. पुढील वर्षी, २०१६ मध्ये ४६९४ प्रकरणे नोंद झाली. अशा गुन्ह्यातील पीडितांची संख्या २०१४ ते २0१६ या तीन वर्षात अनुक्रमे ४००३, ४५८१ व ४७४७ होती. अशा प्रकरणांत मध्यप्रदेश दुसऱ्या, तमिळनाडू तिस-या, आंध्र प्रदेश चौथ्या तर राजस्थान पाचव्या क्रमांकावर आहे.
त्यामुळेच ज्येष्ठांच्या मदतीसाठी दूरसंचार मंत्रालयाने तीन किंवा चार आकडी क्रमांक द्यावा, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. हा क्रमांक देशभरात काम करीत राहील. यासाठी येणारा कॉलचा खर्च संबंधित राज्य सरकारे करतील. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले की वृद्धांच्या मदतीसाठी मदतीसाठी टोलफ्री क्रमांक सुरू करण्याबरोबरच पोलीस कर्मचा-याने दर आठवड्याला त्यांना घरी अशीही व्यवस्था करीत आहोत.
राज्यातील १३ जिल्हे वयोश्री योजनेत
सामाजिक न्याय-अधिकार मंत्रालयानेही संयुक्त ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमांतर्गत वृद्धाश्रम, देशभाल केंद्रे व मोबाइल मेडिकेअर युनिट आदीसाठी महाराष्टÑाला २०१८-१९च्या जुलै मध्यापर्यंत ३१२.८३ लाख दिले. वयोश्री योजनेत शारीरिक सहायक यंत्रांची गरज पडणाºयांना निधी दिला जातो. नागपूर, धुळे, पुणे, ईशान्य मुंबई, कुर्ला-वांद्रे, वर्धा, जालना, उस्मानाबाद, नांदेड, नंदूरबार, वाशिम, गडचिरोली व जळगावचा समावेश आहे.