भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे काेणत्या राज्यात? तपासही पूर्ण होईना!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 01:29 PM2023-12-07T13:29:49+5:302023-12-07T13:30:01+5:30

एनसीआरबीच्या अहवालात धक्कादायक माहिती

Most cases of corruption in which state? The investigation will not be completed! | भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे काेणत्या राज्यात? तपासही पूर्ण होईना!

भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे काेणत्या राज्यात? तपासही पूर्ण होईना!

नवी दिल्ली : प्रगत राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात २०२२ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदविली आहेत. 

केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालानुसार, महाराष्ट्रात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि संबंधित आयपीसी तरतुदीअंतर्गत सर्वाधिक ७४९ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. २०२१ मध्ये भ्रष्टाचाराची ७७३ तर २०२० मध्ये ६६४ प्रकरणे नोंदविण्यात आली होती. १२ प्रकरणे मोठ्या प्रमाणात मालमत्ता असण्याची संबंधित आहेत.   

०० भ्रष्टाचाराची प्रकरणे गोवा, नागालँड, त्रिपुरा, दमण, लडाख येथे २०२२ मध्ये नोंदविण्यात आली आहेत. ७२८ भ्रष्टाचाराची महाराष्ट्रातील प्रकरणे लाच घेताना सापळा लावून ताब्यात घेण्यात आल्याची आहेत. 

प्रकरणे किती निकाली काढली? 
महाराष्ट्रातील १,५०७ भ्रष्टाचाराची मागील प्रकरणातील चौकशी अद्याप प्रलंबित आहे. केवळ सात प्रकरणांमध्ये अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे तर ४९७ प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.याचवेळी देशभरातील ११ हजार १४२ भ्रष्टाचाराची प्रलंबित असून, त्यांची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. 

Web Title: Most cases of corruption in which state? The investigation will not be completed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.