महाराष्ट्र, दिल्लीतून सर्वाधिक मुले बेपत्ता, लोकसभेतील धक्कादायक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:36 AM2018-03-08T01:36:13+5:302018-03-08T01:36:13+5:30

गेल्या तीन वर्षांत देशभरातून १ लाख ९३ हजारांपेक्षा अधिक मुले बेपत्ता झाली होती. त्यातील १ लाख ७६ हजार बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. मात्र अद्यापही ५५,६२५ मुले बेपत्ता असून त्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालमधील मुलांची संख्या सर्वाधिक आहे.

Most children missing from Maharashtra, Delhi, shocking information in Lok Sabha | महाराष्ट्र, दिल्लीतून सर्वाधिक मुले बेपत्ता, लोकसभेतील धक्कादायक माहिती

महाराष्ट्र, दिल्लीतून सर्वाधिक मुले बेपत्ता, लोकसभेतील धक्कादायक माहिती

Next

- नितिन अग्रवाल
नवी दिल्ली - गेल्या तीन वर्षांत देशभरातून १ लाख ९३ हजारांपेक्षा अधिक मुले बेपत्ता झाली होती. त्यातील १ लाख ७६ हजार बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. मात्र अद्यापही ५५,६२५ मुले बेपत्ता असून त्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालमधील मुलांची संख्या सर्वाधिक आहे.
यासंदर्भात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत उत्तर देताना सांगितले की, २०१४, २०१५ व २०१६ या वर्षात महाराष्ट्रातून अनुक्रमे ११३०१, ४४५० व ४३८८ मुले बेपत्ता झाल्याची प्रकरणे नोंदविली गेली होती. या तीन वर्षांत महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या मुलांपैकी २२८९६ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले. मात्र २०१६च्या अखेरीची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रातील ५६२५ बेपत्ता मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही.
मुलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात घट होणे आवश्यक आहे. लोकांच्या जीवीताचे रक्षण करणे ही जबाबदारी मुख्यत्वे राज्य सरकारची आहे. त्यासाठी तसे कायदेही
करण्यात आले आहेत. बेपत्ता
मुलांचा शोध घेण्यासाठी वर्षातील एक महिना विशेष मोहिम हाती
घेतली जावी अशा सूचना गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना दिल्या आहेत. आॅपरेशन स्माइल या नावाने आजवर अशा चार मोहिमा देशभर राबविण्यात आल्या आहेत असेही अहिर यांनी सांगितले.

आॅपरेशन स्माइल
मुले बेपत्ता होण्यावर नियंत्रणाच्या मुद्द्यावर बोलताना अहीर म्हणाले की, लोकांचे जीवित सुरक्षित राखणे हे राज्य सरकारांचे मुख्य काम आहे व कायद्याचा विचार केला तर त्याकामासाठी ते सक्षम आहेत. त्यासाठी गृह मंत्रालयाकडून सल्ला दिला जातो. बेपत्ता मुलांना वाचवण्यासाठी दरवर्षी एक महिन्याची विशेष मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. आतापर्यंत देशभरात आॅपरेशन स्माइलच्या नावाने चार मोहिमा राबवल्या गेल्या आहेत.

Web Title: Most children missing from Maharashtra, Delhi, shocking information in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.