देशात २११ दिवसांतील सर्वाधिक रुग्ण; ऑक्सिजनचा पुरेसा साठा करा, केंद्राच्या राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 07:26 AM2022-01-13T07:26:59+5:302022-01-13T07:27:06+5:30

सक्रिय रुग्ण संख्या ९ लाख ५५ हजारांवर पोहोचले असून, मागील २११ दिवसांतील ते सर्वाधिक प्रमाण आहे.

Most Corona patients in 211 days in the country; Adequate supply of oxygen, instructions to central states | देशात २११ दिवसांतील सर्वाधिक रुग्ण; ऑक्सिजनचा पुरेसा साठा करा, केंद्राच्या राज्यांना सूचना

देशात २११ दिवसांतील सर्वाधिक रुग्ण; ऑक्सिजनचा पुरेसा साठा करा, केंद्राच्या राज्यांना सूचना

Next

नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे १ लाख ९४ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले, तर ४४२ जणांचा मृत्यू झाला. ओमायक्रॉनबाधितांचा आकडा ४८६८ झाला असून, सक्रिय रुग्ण संख्या ९ लाख ५५ हजारांवर पोहोचले असून, मागील २११ दिवसांतील ते सर्वाधिक प्रमाण आहे.

ऑक्सिजनचा पुरेसा साठा करा, राज्यांना सूचना

ओमायक्रॉन रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. किमान ४८ तास  पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा करून ठेवावा असा आदेश संबंधित विभागांना द्यावा अशी सूचना करणारे पत्र केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. ऑक्सिजन नियंत्रण कक्षही सुसज्ज ठेवा असेही केंद्राने सांगितले.

Web Title: Most Corona patients in 211 days in the country; Adequate supply of oxygen, instructions to central states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.