लोकशाही दिनी ठेवीदारांच्या सर्वाधिक तक्रारी

By admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:50+5:302016-02-02T00:15:50+5:30

जळगाव- जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी तीन वाजता पार पडला. यावेळी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, उपवनसंरक्षक एम.आदर्शकुमार रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Most Demand Draft on Democracy Day | लोकशाही दिनी ठेवीदारांच्या सर्वाधिक तक्रारी

लोकशाही दिनी ठेवीदारांच्या सर्वाधिक तक्रारी

Next
गाव- जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी तीन वाजता पार पडला. यावेळी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, उपवनसंरक्षक एम.आदर्शकुमार रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयाशी संबधित ६६ तक्रारी प्राप्त झाल्या. जिल्हा परिषद २४, महसूल विभाग ३८, पोलीस अधीक्षक ९, अधीक्षक भूमी अभिलेख ८, उपवनसंरक्षक २, वीज वितरण कंपनी ३, सार्वजनिक बांधकाम विभाग १, जिल्हा सैनिक कल्याण विभाग १, लघु पाटबंधारे विभाग २, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा १, पाटबंधारे विभाग १ अशा १५६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारी संबधित विभागांकडे पाठविण्यात आल्या आहेत.

महात्मा फुले महामंडळातील लाभार्थ्यांचा सत्कार
जळगाव : शासनाच्या सामाजिक न्याय विभागातंर्गत येणार्‍या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच महामंडळाच्या वसुली उद्दिट्य पूर्ण करण्यासाठी अनेक उपाययोजना कार्यान्वित केलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २६ जानेवारी रोजी प्रजास्ताकदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात महामंडळाच्या ज्या लाभार्थ्यांनी शंभर टक्के कर्ज परतफेड केली आहे, त्यांचा खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्षा अरुणा इंगळे आदी उपस्थित होते.

Web Title: Most Demand Draft on Democracy Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.