अस्सल दागिना व क्वाईनला सर्वाधिक मागणी मुहूर्त साधला : धनत्रयोदशीनिमित्त सराफबाजारात वर्दळ
By admin | Published: October 29, 2016 01:04 AM2016-10-29T01:04:55+5:302016-10-29T01:04:55+5:30
जळगाव : दीपोत्सवात शुक्रवारी धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त साधत अनेकांनी जळगावातील सराफ बाजारात सोन्याचे दागिने, आभूषण व रत्नांची खरेदी केली. अस्सल दागिना व सोन्याच्या क्वाईनला सर्वाधिक मागणी होती.
Next
ज गाव : दीपोत्सवात शुक्रवारी धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त साधत अनेकांनी जळगावातील सराफ बाजारात सोन्याचे दागिने, आभूषण व रत्नांची खरेदी केली. अस्सल दागिना व सोन्याच्या क्वाईनला सर्वाधिक मागणी होती.शुक्रवार २८ रोजी धनत्रयोदशी उत्साहात साजरी करण्यात आली. धनत्रयोदशीबाबत विविध कथाभाग आहे. समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आले होते. धन्वंतरीचे यादिवशी पूजन केले जाते. या दिवशी सर्वच कुटुंबामध्ये धनाची पूजा करण्यात आली. रात्री दक्षिण दिशेकडे दिवा लावण्यात आला. त्यास यमदीपदान असे म्हटले जाते. धन्वतरीची पूजन करून चांगले आरोग्याची धनसंपदा दे अशी प्रार्थना करण्यात आली. मुहूर्त साधण्यासाठी नागरिक सराफ बाजारातसोने व चांदी यांच्या भावात नरमाई आहे. सध्या सोन्याचा प्रति तोळा ३० हजार ७०० असा भाव आहे. तर चांदी ४५ हजार रुपये प्रतिकिलो आहे. सोन्यात ५० टक्के ग्राहकी मणी-मंगळसूत्र, अंगठी, अस्सल दागिने, कर्णफुले यांच्यात होती. तर गोल्ड क्वॉईन, तुकडा यालादेखील चांगली मागणी होती. सोने व चांदीच्या दागिन्यांसोबतच विविध प्रकारचे रत्न खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. सराफ बाजारासह सुवर्णपेढ्यांमध्ये धनत्रयोदशीनिमित्त प्रचंड गर्दी होती. शुक्रवारी दागिने खरेदी व विक्रीच्या माध्यमातून जळगाव शहरातील सुवर्णपेढ्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. बाजारात सर्वत्र चैतन्यदीपोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी बाजारात खरेदीसाठी नोकरवर्ग तसेच मध्यमवर्गीय व गोरगरीब दाखल झाले. त्यामुळे टॉवर चौक, बळीराम पेठ, सुभाष चौक, राजकमल चौक, गोलाणी मार्केट, बँक स्ट्रिट या भागात सर्वाधिक वर्दळ होती. मोठे शो-रुम तसेच हातगाड्यांवर कपडे खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. तर दिवाळीची आठवण रहावी यासाठी मोठ्या वस्तू खरेदीकडे देखील सर्वाधिक कल राहिला. त्यात रेफ्रीजरेटर, एलसीडी, एलईडी, संगणक, मायक्रोओव्हन, दुचाकी, चारचाकी खरेदीतून मोठी उलाढाल झाली.दिवाळी ठरला खरेदीचा अंतिम टप्पागणेशोत्सवापासून विविध कंपन्यांच्या सवलतीच्या योजना सुरू होतात. या योजनांचा अंतिम टप्पा म्हणजे दिवाळी सणांच्या काळात प्रत्येकवेळी यापेक्षा चांगली ऑफर पुढे येईल, या उद्देशाने अनेकवेळा खरेदी पुढे ढकलली जाते. परंतु दिवाळी हा वर्षातील शेवटचा सण असल्यामुळे सर्व कंपन्यांच्या घसघशीत सूट देणार्या ऑफर्स येत असल्यामुळे अनेकजण दिवाळीलाच खरेदी केली. खरेदीचा हा अंतिम टप्पा असल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून ते घर खरेदी करीत नागरिकांनी मुहूर्त साधला.