भारतातील बहुतांश सेक्युलर हे हिंदू विरोधक - तस्लिमा नसरीन

By admin | Published: October 17, 2015 02:46 PM2015-10-17T14:46:11+5:302015-10-17T14:47:16+5:30

भारतातील बहुतांश सेक्युलर मुस्लिम समर्थक असून ते हिंदू विरोधक आहेत, असे विधान तस्लिमा नसरीन यांनी केले. हिंदूंच्या कामांवर कडाडून टीका करणारे सेक्युलर कट्टर मुस्लिमांचा बचाव करतात असे त्या म्हणाल्या.

Most of India's secular Hindu opponents - Taslima Nasreen | भारतातील बहुतांश सेक्युलर हे हिंदू विरोधक - तस्लिमा नसरीन

भारतातील बहुतांश सेक्युलर हे हिंदू विरोधक - तस्लिमा नसरीन

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - भारतातील बहुतांश सेक्युलर मुस्लिम समर्थक असून ते हिंदू विरोधक आहेत, असे विधान प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.  एकीकडे हिंदूंच्या कामांवर कडाडून टीका करणारे हेच लोक कट्टर मुस्लिमांच्या कृत्यांचा मात्र बचाव करतात असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य करतानाच दादरीसारख्या घटनांमुळे देशातील असहिष्णूता वाढत असल्याची भीती व्यक्त केली.
मुस्लिम किंवा अल्पसंख्यांकाविरोधातील हिसांचाराबद्दल पंतप्रधानांनी आणखी आस्थेने बोलण्याची गरज वाटते का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता राजकीय नेते मतांच्या राजकारणांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करतात, अशी टीका त्यांना केली. मुस्लिमांना झुकते माप दिल्याने हिंदू नाराज होतात. अनेकवेळा मुस्लिमांवर पूर्वग्रहामुळे अन्याय होतो, हे खरे असले तरी हाच प्रकार इतर धर्मियांबाबतीतही होतो. २०१३ साली पश्चिम बंगालमधील एका हिंदू गावातील घरे मुस्लिमांनी पेटवल्याचे त्यांनी नमूद केले. जर भारतात मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार झाले असते, त्यांचा छळ झाला असता तर ते भारत सोडून बांग्लादेश किंवा पाकिस्तानसारख्या मुस्लिम राष्ट्रांत गेले असते, असेही त्या म्हणाल्या.  
देशभरातील वाढत्या असहिष्णूततेच्या विरोधात निषेधाच सूर आळवत पुरस्कार परत करणा-या साहित्यिकांची कृती योग्य असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र कधी कधी हे साहित्यिक दुटप्पी भूमिका घेतात अशी टीकाही त्यांनी केली. अन्यायाविरोधात पुरस्कार परत करण्याचा विचार एखादी व्यक्ती मांडते आणि इतर साहित्यिक ती उचलून धरत त्याच मार्गावर चालतात, याच काहीच गैर नाही. पण मतभेद उदभवल्यावर अनेक जण दुटप्पी भूमिका घेतात, असे तस्लिमा यांनी म्हटले आहे. 
जेव्हा माझ्या पुस्तकावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली, भारतात माझ्याविरोधात पाच फतवे काढण्यात आले, मला राज्याबाहेर काढण्यात आलं, एवढचं नव्हे तर दिल्लीत मला घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं, भारताबाहेर जाण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला तेव्हा बहुतेक साहित्यिकांनी चकार शब्दही उच्चारला नाही. उलट सुनील गांगुली आणि शशांक घोष यांच्यासारख्या प्रसिद्ध लेखकांनी तत्कालिन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्याकडे धाव घेऊन माझ्या पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी केली, अशी व्यथाही नसरीन यांनी मांडली.  

Web Title: Most of India's secular Hindu opponents - Taslima Nasreen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.