सरसकट दारूबंदीमुळे प्रश्न कदापि सुटणार नाहीत
By admin | Published: February 1, 2015 01:21 AM2015-02-01T01:21:34+5:302015-02-01T01:21:34+5:30
सरसकट दारूबंदी केल्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, त्याऐवजी नियंत्रण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले.
सुरेश गुदले ल्ल पणजी
सरसकट दारूबंदी केल्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, त्याऐवजी नियंत्रण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले. हिवरेबाजार (जि. अहमदनगर) येथील जलसंवर्धनाच्या कामामुळे देशभर परिचित झालेले पवार येथे एका कार्यक्रमासाठी आले होते.
गोवा आणि दारूच्या समीकरणाविषयी जगभर एक प्रतिमा तयार झाली आहे. गोवा म्हणजे मौजमजा, असेही म्हटले जाते. पोपटराव पवार यांनी व्यसनमुक्तीसाठीही काम केलेले असल्याने त्यांना दारूबंदी विषयावर बोलते केले. तेव्हा युरोपीयन देशांत सर्व कुटुंबीय एकत्र बसून दारू पितात. मात्र युरोप व भारतात मोठे सांस्कृतिक अंतर आहे. आनंद झाला म्हणून दारू प्यायची, मग नोकरी मिळाली यासारखी कारणेही पुरेशी ठरतात. दु:ख झाले म्हणून दारू पिली जाते. दोन्हीही बाबी अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नानाविध कारणांमुळे ‘डिप्रेशन’ वाढल्यानेही लोक व्यसनांच्या आहारी जातात, असे ते म्हणाले. शालेय स्तरावर व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगायला हवेत. हिवरेबाजार येथे आम्ही अशा प्रकारे प्रबोधन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रबोधन करणे हाच व्यसनमुक्तीवर योग्य व शाश्वत पर्याय असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की शालेय मुलांना, तरुणांना काही वर्षांपूर्वी व्यायामशाळा, क्रीडांगणे, मनोरंजनाची सशक्त साधने यांसारखे अनेक पर्याय होते. त्यामुळे अन्य क्षेत्रांमध्ये तरुणाई गुंतली जात होती. मात्र आता शहरांतील चित्र बदलले आहे. अनेक औषधांमध्येही अल्कोहोलचा वापर केलेला असतो़ त्यामुळे पूर्ण दारूबंदीपेक्षा नियंत्रण महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नानाविध कारणांमुळे ‘डिप्रेशन’चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जाते. प्रबोधन हाच त्यावर उपाय आहे. - पोपटराव पवार, सामाजिक कार्यकर्ते