एक देश एक निवडणुकीस बहुतांश पक्षांचा पाठिंबा, राजनाथ सिंह यांचीं माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 08:07 PM2019-06-19T20:07:08+5:302019-06-19T20:11:01+5:30
एक देश एक निवडणूक या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सुमारे २१ पक्षांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली.
नवी दिल्ली - एक देश एक निवडणूक या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सुमारे २१ पक्षांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली. दरम्यान, बैठकीस उपस्थित असलेल्या बहुतांश पक्षांच्या प्रमुखांनी एक देश एक निवडणूक या योजनेस पाठिंबा दिला असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसेच यासंदर्भात विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Defence Minister Rajnath Singh after conclusion of the meeting of Presidents of all parties called by PM Modi: We had invited 40 political parties, out of which Presidents of 21 parties participated and 3 other parties sent their opinion on the subjects in writing. pic.twitter.com/FgsjkEQotg
— ANI (@ANI) June 19, 2019
एक देश एक निवडणूक अंतर्गत देशातील लोकसभा आणि सर्व विधानसभांची निवडणूक एकाच वेळी घेण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने गांभीर्याने पावले उचलली आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला राहुल गांधी, मायावती ममता बॅनर्जी हे प्रमुख विरोधी पक्षांचे नेते अनुपस्थित राहिले. दरम्यान, बैठक आटोपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ''आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित असलेल्या बहुतांश पक्षांच्या प्रमुखांनी एक देश एक निवडणूक या कल्पनेला पाठिंबा दर्शवला आहे. सीपीआय (एम) आणि सीपीआय या पक्षांनी वेगळे मत मांडले. पण या कल्पनेला विरोध दर्शवला नाही. पण या कल्पनेच्या अंमलबजणावणीबाबत प्रश्न उपस्थित केले.''
Defence Minister Rajnath Singh after conclusion of the meeting of Presidents of all parties called by PM Modi: Most parties gave their support to One Nation, One Election, CPI(M) & CPI had a difference of opinion but they didn't oppose the idea, just the implementation of it. pic.twitter.com/Y67a7NQ17V
— ANI (@ANI) June 19, 2019
दरम्यान, एक देश एक निवडणूक या कल्पनेबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.
Defence Minister Rajnath Singh: Prime Minister Narendra Modi, in his address, said that a committee will be constituted to give its suggestions on the subject (One Nation, One Election) in a time bound manner. https://t.co/c3tvK8lg3D
— ANI (@ANI) June 19, 2019