PM Modi : पीएम नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेसमोर सर्वच दिग्ज फेल, जगातील 22 नेत्यांच्या यादीत टॉपवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 10:08 PM2022-08-26T22:08:36+5:302022-08-26T22:09:46+5:30

Morning Consult Survey: जगातील  22 नेत्यांच्या यादीत अमेरिकी राष्ट्रपती ज्यो बायडेन यांना 41 टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.

most popular world leaders 2022 pm Narendra modi tops list with 75 percent rating an joe biden on the fifth position says survey | PM Modi : पीएम नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेसमोर सर्वच दिग्ज फेल, जगातील 22 नेत्यांच्या यादीत टॉपवर

PM Modi : पीएम नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेसमोर सर्वच दिग्ज फेल, जगातील 22 नेत्यांच्या यादीत टॉपवर

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता संपूर्ण जगभरात अद्यापही कायम आहे. मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक रेटिंगमध्ये 75 टक्के अप्रुव्हल रेटिंगसह शीर्षस्थानी आहेत. तर पंतप्रधान मोदींनंतर, मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी हे अनुक्रमे ६३ टक्के आणि ५४ टक्क्यांच्या रेटिंगसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

जो बायडेन कितव्या स्थानावर -
जगातील  22 नेत्यांच्या यादीत अमेरिकी राष्ट्रपती ज्यो बायडेन यांना 41 टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. तर त्यांच्यानंतर कॅनडाचे राष्ट्रपती जस्टिन ट्रूडो 39 टक्के आणि जपानचे पंतप्रधान किशिदा 38 टक्के रेटिंग मिळाले आहे. 

मॉर्निंग कंसल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स सध्या ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, ब्राझील, जर्मनी, भारत, मॅक्सिको, नेदरलँड, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन आणि संयुक्त राज्य अमेरिकेत सरकारी नेत्यांच्या अनुमोदन रेटिंगवर लक्ष ठेवून आहे. यापूर्वी जानेवारी 2022 आणि नोव्हेंबर 2021 मध्येही जगातील लोकप्रीय नेत्यांच्या यादीत मोदी पहिल्या स्थानावरच होते.

हे व्यासपीठ राजकीय निवडणुका, निवडून आलेले अधिकारी आणि मतदानाच्या मुद्द्यांवर रिअल-टाइम मतदान डेटा प्रदान करते. मॉर्निंग कंसल्ट रोज 20,000 हून अधिक ग्लोबल इंटरव्ह्यू आयोजित करते. अमेरिकेत सरासरी सॅम्पल साइज जवळपास 45,000 एवढी आहे. इतर देशांतील सॅम्पल साइज जवळपास 500-5,000 दरम्यान आहे.
 

Web Title: most popular world leaders 2022 pm Narendra modi tops list with 75 percent rating an joe biden on the fifth position says survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.