महाराष्ट्रात सर्वाधिक खासगी सुरक्षा संस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 07:26 AM2022-02-08T07:26:27+5:302022-02-08T07:28:41+5:30
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्योग आणि संस्थांची वाढ होत असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब खासगी सुरक्षा संस्थांची संख्या वेगाने वाढण्यात पडले आहे कारण मोठ्या प्रमाणावर रोजगारही त्यातून उपलब्ध होत आहे.
हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : देशात सर्वांत जास्त २८२१ खासगी सुरक्षा संस्था महाराष्ट्रात असून त्यानंतरचे स्थान २२०३ संस्थांसह गुजरातचे आहे. तथापि, देशाची व्यापारी राजधानी म्हणून स्थान मिळवत असलेल्या दिल्लीत केवळ ७४८ सुरक्षा संस्था आहेत. २८ जानेवारी, २०२२ रोजी एकूण १६४२७ खासगी सुरक्षा संस्था आहेत.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्योग आणि संस्थांची वाढ होत असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब खासगी सुरक्षा संस्थांची संख्या वेगाने वाढण्यात पडले आहे कारण मोठ्या प्रमाणावर रोजगारही त्यातून उपलब्ध होत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील आकडेवारी उपलब्ध नाही आणि संस्थांची नोंदणी राज्यात शून्य आहे. याची अनेक कारणे असू शकतात; परंतु, या अशांत राज्यात औद्योगिक कामकाज हे फारच कमी असल्याचेही यातून दिसते.
पंजाब हे पाकिस्तानच्या सीमेवरील राज्य असून तेथे अशा ८४२ संस्था आहेत तर १११८ संस्था हरयाणात आणि गोव्यात फक्त ९७ संस्था आहेत. देशात किती खासगी सुरक्षा संस्था आहेत याच्या संख्येची माहिती एकत्रित केलेली नाही.