बहुतांश सराफा व्यापाऱ्यांकडून संप मागे
By admin | Published: April 13, 2016 02:44 AM2016-04-13T02:44:41+5:302016-04-13T02:44:41+5:30
देशातील बहुतेक सराफांचा संप तब्बल सहा आठवड्यांनंतर मंगळवारी संपला. सोन्याच्या दागिन्यांवरील नियोजित एक टक्का अबकारी कर मागे घ्यावा या मागणीसाठी सोन्या-चांदीचे
नवी दिल्ली : देशातील बहुतेक सराफांचा संप तब्बल सहा आठवड्यांनंतर मंगळवारी संपला. सोन्याच्या दागिन्यांवरील नियोजित एक टक्का अबकारी कर मागे घ्यावा या मागणीसाठी सोन्या-चांदीचे व्यापारी, दागिने विक्रेते व कारागीर दोन मार्चपासून संपावर
होते.
महाराष्ट्रातील सराफांनी त्यांचा संप १४ ते २४ असा तात्पुरता मागे घेतला आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी दिली. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील दागिन्यांची दुकाने उघडली होती, तर दिल्ली आणि मुंबईतील दागिन्यांचे काही शोरूम्स आणि दुकाने उघडी होती व काही बंद. अबकारी कराची अंमलबजावणी सोपी करण्याचे आश्वासन राजस्थान सरकारने दिल्यानंतर दागिने व सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली, असे राजस्थान सराफा संघाचे अध्यक्ष सुभाष मित्तल यांनी सांगितले. मागणी मान्य न झाल्यास संप पुन्हा सुरू केला जाईल असा इशारा त्यांनी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिरी यांच्या नेतृत्वाखालील समिती सराफांच्या मागण्यांचा विचार करणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत सराफांचा संप मागे घेतला जाईल, असे व्यापार महासंघ असोचेमचे राष्ट्रीय मोती आणि दागिने विभागाचे अध्यक्ष शंकर सेन यांनी सांगितले.