भारताचा आणखी एक शत्रू ठार?; मोस्ट वाँटेड मसूद अजहरला अज्ञातांनी संपवल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 08:49 AM2024-01-02T08:49:02+5:302024-01-02T09:00:01+5:30

पहाटे ५ च्या सुमारास बहावलपूर येथील मस्जिदमधून परतताना काही अज्ञातांनी बॉम्बस्फोट घडवला

Most wanted terrorist Masood Azhar was killed by unknown persons, trending again in India | भारताचा आणखी एक शत्रू ठार?; मोस्ट वाँटेड मसूद अजहरला अज्ञातांनी संपवल्याची चर्चा

भारताचा आणखी एक शत्रू ठार?; मोस्ट वाँटेड मसूद अजहरला अज्ञातांनी संपवल्याची चर्चा

नवी दिल्ली - Masood Azhar killed by unknown men ( Marathi News ) भारताचा आणखी एक शत्रू आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहर ठार झाल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे. यावर अद्याप कुणीही अधिकृत माहिती दिली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, जैश ए मोहम्मद प्रमुख पहाटे ५ वाजता मारला गेला. पाकिस्तानच्या बहावलपूर इथं झालेल्या एका बॉम्ब स्फोटात मसूदचा मृत्यू झाल्याचं पुढे आले. दाऊद इब्राहिमनंतर भारतीय संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहरच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 

अज्ञात हल्लेखोरांकडून केलेल्या बॉम्बस्फोटात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर ठार झाला. पहाटे ५ च्या सुमारास बहावलपूर येथील मस्जिदमधून परतताना काही अज्ञातांनी बॉम्बस्फोट घडवला. त्यात मसूदचा मृत्यू झाला. मसूद अजहर हा भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. त्याच्यावर कंधार विमान अपहरण, संसद हल्ला यासारखे आरोप आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मसूद अजहरचा जन्म १० जुलै १९६८ ला झाला. मसूद अजहर त्या दहशतवाद्यांपैकी एक आहे ज्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करून कंधारला घेऊन गेले होते. त्याचसोबत १३ डिसेंबर २००१ ला भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंडही मसूद अजहर आहे. 

याआधी नोव्हेंबर २०२३ ला अजहरचा राईट हँड मौलाना रहिमुल्ला तारीकला पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी गोळी मारून ठार केले. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोर अनेक मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना यमसदनी पाठवत आहेत. मात्र आतापर्यंत या हल्लेखोरांना पकडण्यात तपास यंत्रणांना यश आले नाही.मसूद अजहर पाकिस्तानच्या इस्मालाबाद इथं डीप स्टेटच्या सुरक्षेत राहत होता. काही महिन्यांपासून कॅनडा आणि पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांकडून दहशतवाद्यांना टार्गेट करण्यात येत आहे. त्यात अनेक मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचा समावेश आहे.

या सर्व हल्ल्यांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे हल्ल्यात अज्ञात हल्लेखोर मोटारसायकलचा वापर करून टार्गेट केलेल्या दहशतवाद्यांना गोळ्या घालत आहेत तर काही ठिकाणी स्फोट घडवून मारले जात आहे. अलीकडेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबतही अशीच चर्चा सोशल मीडियात उठली होती. त्यात दाऊदवर विषप्रयोग झाला असून त्याला कराचीतील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यात दाऊदला भेटण्याची काही निवडक लोकांनाचा परवानगी आहे असं बोलले जात होते. 

Web Title: Most wanted terrorist Masood Azhar was killed by unknown persons, trending again in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.