भारताविरुद्ध कट रचणारे पाक अधिकारी मोस्ट वाँटेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:16 AM2018-04-10T04:16:38+5:302018-04-10T04:16:38+5:30

भारताविरुद्ध हल्ल्याचा कट रचणाऱ्या एका पाकिस्तानी राजनैतिक अधिका-यांसह तिघांना भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत टाकले आहे.

Most Watched Pakistan Official for Cutting India | भारताविरुद्ध कट रचणारे पाक अधिकारी मोस्ट वाँटेड

भारताविरुद्ध कट रचणारे पाक अधिकारी मोस्ट वाँटेड

Next

नवी दिल्ली : भारताविरुद्ध हल्ल्याचा कट रचणाऱ्या एका पाकिस्तानी राजनैतिक अधिका-यांसह तिघांना भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत टाकले आहे. आमिर झुबेर सिद्दिकी असे त्याचे नाव असून, त्याचे छायाचित्रही प्रसिद्धीस दिले आहे. तिघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करावी, अशी विनंती एनआयएतर्फे इंटरपोलला केली जाणार आहे.
या तिघांना पाकिस्तानने लगेच मायदेशी बोलावून घेतले आहे. अन्य देशांमध्ये त्यांच्यावर कारवाई होऊ नये व देश नाव बदनाम होऊ नये, यासाठी पाकने त्यांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
आमिर झुबेर सिद्दिकी श्रीलंकेत कोलंबोमध्ये पाकिस्तानी उच्चायोगात व्हिसा सल्लागार म्हणून काम करतो. त्याने २०१४ साली दक्षिण भारतातील लष्कर व नौदलाच्या तळांवर आणि भारतातील अमेरिका व इस्त्राएलच्या दूतावासांवर २६/११ सारखा हल्ला करण्याचा कट रचला होता, असे एनआयएला आढळून आले. त्यामुळे त्यांना मोस्ट वाँटेडच्या यादीत घालण्यात आले.
>आयएसआयचे दोघे
सिद्दिकीसह जे अधिकारी कटात सहभागी होते, त्यांची ओळख पटलेली नाही. मात्र, ते दोघेही पाकिस्तानच्या इंटर स्टेट इंटलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संघटनेचे अधिकारी आहेत.

Web Title: Most Watched Pakistan Official for Cutting India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.