भयंकर! 'त्या' हत्याकांडाचं गूढ उकललं; मुलीनेच केली होती आई, भावाची हत्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 04:38 PM2020-08-30T16:38:37+5:302020-08-30T16:44:06+5:30

रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी (आयआरटीएस) आरडी बाजपेयी यांच्या निवासस्थानी त्यांची पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

mother and brother shot dead by daughter lucknow father railway officer delhi | भयंकर! 'त्या' हत्याकांडाचं गूढ उकललं; मुलीनेच केली होती आई, भावाची हत्या अन्...

भयंकर! 'त्या' हत्याकांडाचं गूढ उकललं; मुलीनेच केली होती आई, भावाची हत्या अन्...

Next

उत्तर प्रदेशगुन्हेगारी घटनांमुळे हादरले आहे. लखनऊमधील पॉश भागातील रेल्वेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या घरात डबल मर्डर झाल्याने खळबळ उडाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली होती. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी (आयआरटीएस) आरडी बाजपेयी (RD Bajpai) यांच्या निवासस्थानी त्यांची पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणाचा अधिक तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली आहे. 

पोलिसांना या दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकलण्यात यश आले आहे. रेल्वे अधिकाऱ्याच्या मुलीनेच आई आणि भावाची हत्या केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तसेच मुलीने या घटनेनंतर स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून घेतले आहेत. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने लखनऊमध्ये खळबळ उडाली असून बंगल्याच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. लखनऊचे डीजीपी हितेश चंद्र अवस्थीदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, वाजपेयी यांच्या मुलीनेच आई आणि भावाची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मुलगी अल्पवयीन असून राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी तिच्याकडे याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर तिने स्वतः हत्या केल्याचं कबूल केलं. तसेत मुलगी मानसिक तणावात असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 रेल्वेच्या गौतमपल्ली कॉलनीमध्ये वरिष्ठ अधिकारी आरडी बाजपेयी यांच्या पत्नीचा व मुलाचा मृतदेह सापडला होता. दोघांनाही गोळी मारण्यात आली होती. सुरुवातीला गुन्हेगारांनी हे कृत्य केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र पोलीस तपासात मुलीनेच या दोघांवर गोळ्या झाडल्याची कबुली दिली आहे. गोतमपल्ली परिसर हा शहरातील व्हीआयपी भाग आहे. याठिकाणी मंत्री, मुख्यमंत्री, मोठमोठे सरकारी अधिकारी राहतात. मुख्यमंत्री निवासस्थान आणि राजभवनही 100 मीटरवर आहे. यामुळे येथे  पोलीस तैनात असतात. एवढी सुरक्षा असताना या भागात दुहेरी हत्याकांड ते देखील बंदुकीच्या गोळ्या झाडून केल्याने खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"... मात्र पंतप्रधानांनी केली 'खेळण्यांवर चर्चा'", राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

"चाकरमान्यांना यावर्षी एवढे का छळताय?, कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?"

बापरे! 17 वर्षांपासून तरुणाच्या डोक्यात होता 5 इंचाचा किडा, डॉक्टरांनाही बसला धक्का

काय सांगता? तब्बल 28 वर्षांनी मिळालं चोरीला गेलेलं मंगळसूत्र 

माता न तू वैरिणी! पतीने माहेरी जाऊ दिलं नाही, पत्नीने 2 मुलींची केली हत्या

Web Title: mother and brother shot dead by daughter lucknow father railway officer delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.