कुलभूषण जाधवच्या भेटीसाठी आई आणि पत्नी उद्या पाकिस्तानात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 07:47 AM2017-12-24T07:47:00+5:302017-12-24T11:59:33+5:30
पाकिस्तानी कारागृहात हेरगिरीच्या आरोपात बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई उद्या म्हणजे 25 डिसेंबर रोजी पाकिस्तानात जाणार आहेत. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे. 25 डिसेंबर रोजी व्यावसायिक विमानाने कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई पाकिस्तानात पोहोचतील आणि त्याच दिवशी ते परततील. यावेळी पाकिस्तानातील भारतीय उप-उच्चायुक्त जे.पी सिंग देखील बरोबर असतील.
इस्लामाबाद - पाकिस्तानी कारागृहात हेरगिरीच्या आरोपात बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई उद्या म्हणजे 25 डिसेंबर रोजी पाकिस्तानात जाणार आहेत. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे. 25 डिसेंबर रोजी व्यावसायिक विमानाने कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई पाकिस्तानात पोहोचतील आणि त्याच दिवशी ते परततील. यावेळी पाकिस्तानातील भारतीय उप-उच्चायुक्त जे.पी सिंग देखील बरोबर असतील. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.
India informs that the mother and wife of Commander Jadhav will arrive by commercial flight on 25 Dec and leave the same day. Indian DHC in Islamabad will be the accompanying diplomat.
— Dr Mohammad Faisal (@ForeignOfficePk) December 23, 2017
20 डिसेंबर रोजी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानने व्हिसा जारी केला होता. त्यामुळे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी जाण्याचा कुटुंबीयांचा मार्ग मोकळा झाला. हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या अपिलावरून मे महिन्यात शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे जगभरात पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती.
तात्काळ फाशीचा धोका नाही, पाकिस्तानची माहिती-
आई आणि पत्नीला दिलेली भेटीची संधी ही शेवटची संधी ठरणार नाही, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी दिली आहे. गुरूवारी या संदर्भातील माहिती समोर आली आहे. कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला त्यांच्या भेटीसाठी दिलेली परवानगी ही पूर्णपणे मानवतेच्या दृष्टीने देण्यात आली असून कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा कुठलाच धोका नाही, असं गुरूवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत डॉ.मोहम्मद फैसल यांनी म्हंटलं आहे. कुलभूषण जाधव यांची दया याचिका अजूनही प्रलंबित असल्यानं ही बाब स्पष्ट होते, असंही ते म्हणाले. कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट झाल्यावर त्यांना तात्काळ फाशी देण्यात येईल का ? यांसारख्या प्रश्नावर मोहम्मद फैसल यांनी उत्तरं दिली आहेत.
कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला भेटीसाठी देण्यात आलेली संधी ही इस्लामी परंपरेनुसार पूर्णपणे मानवतेचा विचार करुन देण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने या दोघींनाही व्हिसा मंजूर केला आहे. त्यांची जाधव यांच्याशी सोमवारी पाकिस्तानातील विदेश मंत्रालयात भेट होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय उच्चायुक्तांमधील एका प्रतिनिधीलाही जाण्याची परवानगी देण्यात येईल, असंही डॉ. फैसल यांनी म्हंटलं. पाकिस्तानकडून जाधव यांच्या आई आणि पत्नीला माध्यमांशी बोलण्याचीही परवानगी दिली जाणार आहे. या संदर्भात आम्ही भारताच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं फैसल यांनी सांगितलं.