आर्थिक अडचणीला कंटाळलेली आई ३ वर्षीय मुलीला जिवंत दफन करत होती, गावकऱ्यांनी वाचवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 10:34 AM2021-07-02T10:34:01+5:302021-07-02T10:35:39+5:30
घटनास्थळी पोहोचलेल्या चाइल्डलाईनच्या टीमने आईसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिची मानसिक स्थिती बघत कुपोषित मुलीला पोषण पुनर्वास केंद्रात दाखल केलं.
(प्रातिनिधीक छायाचित्र)
उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीच्या मृत्यूनंतर आर्थिक अडचण आणि उपासमारीमुळे एक महिला डिप्रेशनमध्ये गेली. आणि या स्थितीत तिने आपल्या तीन वर्षीय कुपोषित मुलीला मरण्यासाठी एका खड्ड्यात फेकून तिच्याववर माती टाकली.
सुदैवाने महिलेचा हा कारनामा गावातील लोकांनी पाहिला आणि त्यानंतर तीन वर्षीय चिमुकलीला खड्ड्यातून काढून तिचा जीव वाचवला. त्यानंतर त्यांनी पोलीस आणि चाइल्डलाईनला याची माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचलेल्या चाइल्डलाईनच्या टीमने आईसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिची मानसिक स्थिती बघत कुपोषित मुलीला पोषण पुनर्वास केंद्रात दाखल केलं. दोघींवरही उपचार सुरू आहेत. तसेच या प्रकाराबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आलं की, कुपोषित मुलीची आई डिप्रेशनमध्ये आहे. तसेच त्यांना मदत केली जात असल्याचा दावाही केला आहे.
प्रशासनाने आर्थिक अडचणीमुळे आणि उपासमारीमुळे महिलेने मुलीला जिवंत दफन करण्याची घटना खोटी असल्याचं सांगितलं. तेच कुपोषित मुलीला आणि तिच्या परिवाराला सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावाही केला आहे.
सकरौली गावातील रहिवाशी भगवानदीनने दहा वर्षाआधी बिहारच्या राजकुमारी नावाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं. भगवानदीनला तीन मुले होती धर्मवीर, नंदनी आणि सर्वात लहान तीन वर्षीय मधु. कॅन्सरमुळे दोन वर्षाआधी भगवानदीनचा मृत्यू झाला. उपचारासाठी आधीच बरीच शेती विकली गेली होती. राजकुमारी आणि तीन मुले अनाथ झाले. राजकुमारी मुलांसोबत गावातच राहत होती.
आर्थिक अडचण आणि उपासमारीमुळे तिची लहान मुलगी कुपोषित झाली. कुपोषित मुलीमुळे महिला परेशान झाली होती. त्यानंतर महिलेने आपल्या मुलीला एका खड्ड्यात दफन केलं. सुदैवाने लोकांनी आणि प्रशासनाने मुलीला वाचवलं.