Mother Dairy Milk Price Hike : अमूल पाठोपाठ आता 'मदर डेअरी'कडूनही दूध दरवाढीची घोषणा; जाणून घ्या नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:29 AM2021-07-10T11:29:21+5:302021-07-10T11:38:10+5:30

Mother Dairy Milk Price Hike : अमूल पाठोपाठ आता मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

mother dairy increased prices of all its variant milks by rs 2 rupees per liter | Mother Dairy Milk Price Hike : अमूल पाठोपाठ आता 'मदर डेअरी'कडूनही दूध दरवाढीची घोषणा; जाणून घ्या नवे दर

Mother Dairy Milk Price Hike : अमूल पाठोपाठ आता 'मदर डेअरी'कडूनही दूध दरवाढीची घोषणा; जाणून घ्या नवे दर

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोना संकट काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यानं अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यात आता दुधाची भर पडली आहे. एक जुलैपासून अमूलचं दूध 2 रुपयांनी महागलं आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये नवे दर लागू करण्यात आले आहेत. अमूल पाठोपाठ आता मदर डेअरीने (Mother Dairy) दुधाच्या दरात वाढ (Milk Price Hike) करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मात्र मदर डेअरीने फक्त दिल्ली आणि एनसीआरमध्येच दरवाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली-एनसीआर वगळता इतर ठिकाणच्या ग्राहकांना सध्या थोडासा दिलासा मिळाला आहे.

मदर डेअरीचं दूध खरेदी करताना दिल्ली आणि एनसीआरमधील ग्राहकांना आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. दुधाचे वाढीव दर हे उद्यापासून म्हणजेच 11 जुलैपासून लागू करण्यात आले आहेत. मदर डेअरीने याआधी 2019 मध्ये दुधाच्या दरांमध्ये वाढ केली होती. सर्व प्रकारच्या दूधावर ही दरवाढ लागू असणार आहे असं कंपनीने म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात महागाई प्रचंड वाढली असून, कंपनीलाही महागाईचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे दूध उत्पादनावरही परिणाम झाला असल्याचं देखील कंपनीने म्हटलं आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये एक लिटर क्रीम दूध 55 रुपयांऐवजी 57 रुपयांना मिळणार आहे. टोन्ड दूधाचे दरही 45 रुपयांवरून 47 रुपये झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमूलच्या सर्व उत्पादनांच्या किमतीत वाढ झाली आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रिम यांच्या किमतीत लिटरमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली, एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर सर्वच राज्यांमध्ये नवे दर लागू झाले आहेत. जवळपास दीड वर्षांनी अमूलकडून उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. नवे दर लागू झाल्यानंतर अमूल गोल्डची किंमत 58 रुपये प्रति लीटर झाली आहे. 

गोकुळकडूनही दूध दरवाढीची घोषणा; जाणून घ्या नवे दर

गोकुळ दूध संघाने दुधाच्या दरात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी हसन मुश्रीफही उपस्थित होते. गोकुळ दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ केली आहे. म्हशीच्या दुधाला 2 रुपये तर गायीच्या दुधाला 1 रुपयांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच  दूध खरेदी दरवाढ 11 जुलैपासून लागू होणार असून, दूध खरेदी दरवाढीमूळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य भागांत दूध विक्री दरात वाढ करण्यात येत असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली. 


 

Web Title: mother dairy increased prices of all its variant milks by rs 2 rupees per liter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.