Milk Price Update : 'या' कंपनीचं दूध चार रुपयांनी स्वस्त मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 08:59 AM2019-10-01T08:59:50+5:302019-10-01T09:04:51+5:30

Milk Price Update : सरकारनं प्लास्टिकवर बंदी घातल्यानं मदर डेअरीनं ग्राहकांना पॅकेटवाल्या दुधाऐवजी टोकनवालं दूध उपलब्ध करण्याची नामी शक्कल लढवली आहे.

mother dairy s token milk will be cheaper by four rupees | Milk Price Update : 'या' कंपनीचं दूध चार रुपयांनी स्वस्त मिळणार 

Milk Price Update : 'या' कंपनीचं दूध चार रुपयांनी स्वस्त मिळणार 

googlenewsNext

नवी दिल्लीः सरकारनं प्लास्टिकवर बंदी घातल्यानं मदर डेअरीनं ग्राहकांना पॅकेटवाल्या दुधाऐवजी टोकनवालं दूध उपलब्ध करण्याची नामी शक्कल लढवली आहे. मदर डेअरी टोकनवालं दूध पॅकेटवाल्या दुधाच्या तुलनेत 4 रुपये प्रतिलिटर स्वस्त देणार आहे. 

मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक संग्राम चौधरी यांच्या मते, सरकार टोकनच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी काही ठोस पावलं उचलणार आहे. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, फरिदाबाद आणि गाझियाबादमधल्या नागरिकांच्या जीवनातून प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करणार आहोत. जर ग्राहकानं टोकनच्या माध्यमातून दूध खरेदी केल्यास त्याला प्रतिलिटर चार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला प्रदूषणमुक्त करण्याच्या मोहिमेला हातभार लागणार आहे. कंपनी स्वतःच्या रिटेल सेल आउटलेट्स वेंडिंग मशीनच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. 

मदर डेअरीनं टोकनच्या दुधाची मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात स्वतःची क्षमता 10 लाख लीटर प्रतिदिवसापर्यंत वाढवली आहे. आता मोठ्या प्रमाणात वेंडिंग मशिन्सला कार्यान्वित करण्यात येणार असून, अशानं ग्राहकांनाही वर्षाला मोठा फायदा पोहोचणार आहे. 

Web Title: mother dairy s token milk will be cheaper by four rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.