कौतुकास्पद! सासरच्यांनी घराबाहेर काढलं पण पतीने दिली साथ; आता करते लाखोंची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 03:50 PM2023-02-21T15:50:29+5:302023-02-21T15:53:42+5:30
लग्नानंतर सहा महिन्यांतच घरातून बाहेर काढलं.
कोणतेही नवीन काम सुरू केले की अडचणी येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. रामपूर येथील रहिवासी असलेल्या अफसानाने कष्टाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 20 वर्षांपूर्वी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या आग्रहामुळे तिला सासरच्या घरातून बाहेर काढण्यात आलं. पण नवऱ्याने तिला साथ दिल्याने तिला प्रोत्साहन मिळाले आणि तिने तीन हजार रुपये घेऊन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला गावोगावी जाऊन कपडेही विकले.
आज अफसाना लेडीज सूट, साडी, दुपट्टा, कुर्ता आणि रामपूरच्या प्रसिद्ध पेचवर्कमध्ये चांगले काम करत आहे आणि वर्षाला 7 ते 8 लाख रुपये कमावते आहे. यासोबतच ती 400 हून अधिक महिलांना रोजगारही देत आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज यांनी अफसाना यांचा शाल देऊन सत्कार केला. अफसानाने सांगितले की, 23 वर्षांपूर्वी तिचे लग्न झालं होतं. तिला लग्नापासून स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते.
सासरच्या मंडळींना हे आवडले नाही. बदनामीच्या भीतीने त्यांनी मला कोणतेही काम करू दिले नाही. लग्नानंतर सहा महिन्यांतच घरातून बाहेर काढलं. यादरम्यान पतीने साथ दिली आणि घर सोडलं. ती तिच्या माहेरच्या घरी गेली आणि नवऱ्याच्या मदतीने गावोगावी कपडे विकू लागली. ही प्रक्रिया सुमारे तीन वर्षे चालली.यानंतर ती पती आणि तीन मुलांसह भाड्याने राहू लागली. यादरम्यान तिने अनेक महिलांसोबत गावोगावी जाऊन कपडे विकण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये तिला कमिशन मिळायचे.
अफसानाने सांगितले की, एके दिवशी स्वतःचे काम सुरू करण्याचा विचार आला. त्यासाठी महर्षी बचतगट स्थापन केला आणि दिल्लीहून कापड आणून कारागिरांकडून ते बनवायला सुरुवात केली. त्यानंतर तीन हजार रुपये घेऊन काम सुरू केल्याचे अफसानाने सांगितले. एकदा शासनाकडून पाच हजार रुपयांचे अनुदान मिळाले, त्याच्या मदतीने काम वाढले. लोकांना त्यांची उत्पादने आवडू लागली. आज वर्षाला सुमारे 7-8 लाख रुपये कमावले जात आहेत. अफसाना यांच्या ग्रुपमध्ये सुमारे 400 महिला काम करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"