बाबो! 3 लेकरांची आई 6 मुलांचा बाप असलेल्या प्रियकरासोबत पळाली; पतीने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 03:25 PM2023-01-10T15:25:56+5:302023-01-10T15:27:44+5:30
प्रियकरासोबत पळून गेलेली पत्नी रोज व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत होती.
राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 3 लेकरांची आई असलेली महिला 6 मुलांचा बाप असलेल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना समोर आली आहे. यानंतर महिलेच्या पतीने टोकाचं पाऊल उचललं. मतोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारसिंगो येथील बास गावात सोमवारी भंवरलाल मेघवाल यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्याने पत्नीसह पाच जणांनी आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा उल्लेख केला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी भंवरलाल याच्या पत्नीला रणीसर येथील रहिवासी मोहनराम यांचा मुलगा जसुराम मेघवाल हा पळवून घेऊन गेला होता. तेव्हापासून ती त्याच्यासोबत राहते. तिला तीन मुले आहेत पण मुले, पती आणि कुटुंब सोडून ती प्रियकराकडे राहत आहे. ती प्रियकरासोबत गेल्यावर पीडितेचा पती पोलिसात गेला. पोलिसांनी तपास केला असता ते स्वेच्छेने जगत असल्याचे समोर आले.
प्रियकरही सहा मुलांचा बाप आहे. मात्र स्वेच्छेने गेल्याने पोलीसही मदत करू शकले नाहीत. इथे तीन मुलांची जबाबदारी त्याच्यावर आली. त्याला काळजी वाटू लागली. सासरच्यांनीही साथ दिली नाही. प्रियकरासोबत पळून गेलेली पत्नी रोज व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत होती. अशा स्थितीत नैराश्यात असलेल्या भंवरलाल यांनी सोमवारी सकाळी झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. सुसाईड नोटमध्ये त्याची पत्नी आणि प्रियकर मोहनराम यांच्यासह पाच जणांना आत्महत्येसाठी भाग पाडल्याचे लिहिले आहे. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. .
भंवरलालची पत्नी आणि तिचा प्रियकर मोहनराम हे वेगवेगळ्या गुन्ह्यात तुरुंगात गेले होते, असे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. एकदा ती पळून गेल्यावर तिला परत आणण्यात आले पण एके दिवशी ती संधी साधून रात्री पुन्हा पळून गेली. दोघेही भंवरलालला जीवे मारण्याची धमकी देत होते, असा आरोप केला आहे. मोहनराम मेघवाल याने वर्षभरापूर्वी मृत भंवरलाल याच्या पत्नीला बहीण बनवले होते. यानंतर तो घरी येऊ लागला. नंतर दोघं पळून गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"