ना वयाचं बंधन, ना मुलांचं टेन्शन; 50 वर्षीय आत्या 20 वर्ष लहान भाच्याच्या प्रेमात, आहेत 6 मुलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 05:06 PM2023-03-21T17:06:26+5:302023-03-21T17:11:05+5:30
6 मुलांची आई असलेली 50 वर्षीय महिला तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या भाच्याच्या प्रेमात पडल्य़ाची अजब घटना घडली आहे.
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून प्रेमप्रकरणाचे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. 6 मुलांची आई असलेली 50 वर्षीय महिला तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या भाच्याच्या प्रेमात पडल्य़ाची अजब घटना घडली आहे. यानंतर तिने प्रियकरासोबत प्लॅन केला आणि 60 हजार रुपये घेऊन पतीच्या घरातून पळून गेली. गेल्या एक महिन्यापासून महिलेचा पती आणि मुलं तिच्या शोधात शासकीय कार्यालयात चकरा मारत आहेत.
पोलीस महिला आणि तिच्य़ा प्रियकराला अजून शोधू शकलेले नाहीत आणि कुटुंबीयांनाही काही सुगावा लागलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बुंदेलखंडमधील सागर जिल्ह्याशी संबंधित आहे. एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार केली असून पत्नीला शोधण्याची विनंती केली आहे. मीडियाशी बोलताना सरवनने सांगितले की, त्याची पत्नी हेलनबाई कुचबंदिया आपल्या 30 वर्षीय भाच्यासोबत पळून गेली आहे. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या रात्री घरात सर्वजण झोपले होते. रात्री साडेअकरा वाजता त्याला अचानक जाग आली तेव्हा हेलन त्याच्यासोबत नव्हती.
"पत्नी घरातून बेपत्ता झाली"
"मी घराच्या इतर खोल्यांमध्येही पाहिलं तर ती कुठेच दिसली नाही. पत्नी घरातून बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवसापर्यंत तिचा शोध घेतला. नातेवाईकांना बोलावले. कुठेही माहिती न मिळाल्याने पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. मी अनेकवेळा पोलीस ठाण्यात आलो, सीएम हेल्पलाइनवर तक्रार केली, पण कोणीही शोधून काढले नाही" असं पतीने म्हटलं आहे.
60 हजार रुपये घेऊन पत्नी फरार
हेलनचा भाचाही तेव्हापासून घरी नसल्याचं सरमन सांगतात. ती त्याच्यासोबत 60 हजार रुपये घेऊन निघून गेली. त्यांच्यासोबत सोनू नावाचा एक मुलगाही आहे. तिघेही एकत्र आहेत. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात नाही. दुसरीकडे, या प्रकरणाबाबत देवरी पोलीस स्टेशनचे प्रभारी उपमा सिंह सांगतात की, महिनाभरापूर्वी एक अर्ज देण्यात आला होता, ज्यावर बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र त्यांनी ना कोणाचा मोबाईल नंबर दिला होता ना इतर कोणतीही माहिती दिली होती. पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"