प्यार तूने क्या किया! 8 मुलांची आई 3 मुलांचा बाप असलेल्या प्रियकरासह पळाली; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 05:07 PM2023-06-13T17:07:51+5:302023-06-13T17:13:18+5:30

महिलेला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी महिलेच्या पतीने प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

mother of eight children eloped with husband friend in sambhal hazratnagar garhi | प्यार तूने क्या किया! 8 मुलांची आई 3 मुलांचा बाप असलेल्या प्रियकरासह पळाली; नेमकं काय घडलं?

प्यार तूने क्या किया! 8 मुलांची आई 3 मुलांचा बाप असलेल्या प्रियकरासह पळाली; नेमकं काय घडलं?

googlenewsNext

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. कोण कधी कोणाच्या कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना आता उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. संभलच्या हजरतनगर गढी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात आठ मुलांची आई तिच्या नवऱ्याच्या मित्रासह पळून गेल्याची घटना समोर आली आहे. महिलेला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी महिलेच्या पतीने प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे हद्दीतील गावातील तरुणाचा निकाह डिडौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीसोबत 2004 साली झाला होता. लग्नानंतर त्यांना आठ मुलं झाली. सहा मुली आणि दोन मुलं असल्याचं सांगण्यात येत आहे. राज असं या व्यक्तीचं नाव असून तो गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. 

राजला आपल्या कामात एका मजुराची गरज होती, त्यासाठी तो गावातील एका तरुणाला बोलवायचा. तो तरुण राजचा मित्र देखील होता. याच दरम्यान राजची पत्नी आणि मजूर यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मजुराचे घरी येणे जाणे वाढले. त्यानंतर ते एकमेकांना भेटू लागले आणि संधी मिळताच पळून गेले. 

महिलेच्या पतीने व तिच्या मुलांनी सर्वप्रथम नातेवाईक व गावात महिलेचा शोध घेतला, मात्र ती महिला कुठेच सापडली नाही. ती गावात राहणाऱ्या पतीच्या मित्रासोबत पळून गेल्याचे समोर आलं. महिला ज्या व्यक्तीसोबत गेली आहे तो तीन मुलांचा बाप आहे. आपल्या मुलांना सोडून गेलेल्या या दोघांची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: mother of eight children eloped with husband friend in sambhal hazratnagar garhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.