सूत जुळलं! ५ मुलांच्या आईचं तरुणावर प्रेम जडलं; दोघांना रंगेहाथ पकडलं, जबरदस्तीने लग्न लावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:07 IST2025-04-23T16:07:05+5:302025-04-23T16:07:47+5:30
पाच मुलांची आई एका तरुणाच्या प्रेमात पडली. लोकांनी तिला त्याच्यासोबत रंगेहाथ पकडलं.

सूत जुळलं! ५ मुलांच्या आईचं तरुणावर प्रेम जडलं; दोघांना रंगेहाथ पकडलं, जबरदस्तीने लग्न लावलं
प्रेम आंधळं असतं, त्याला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. पाच मुलांची आई एका तरुणाच्या प्रेमात पडली. लोकांनी तिला त्याच्यासोबत रंगेहाथ पकडलं. गावकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मुफस्सिल पोलीस ठाण्यातील सुजा गांधी गावातील गावकऱ्यांनी पाच मुलांच्या आईला एका तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. सर्वात आधी तरुणाला मारहाण करण्यात आली आणि नंतर दोघांचंही जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. फोटोमध्ये महिला आणि तिच्या प्रियकरासह लोकांची गर्दी जमल्याचं पाहायला मिळत आहे.
गावातील पाच मुलांची आईचे गेल्या एक वर्षापासून गावात राहणारा डेटा ऑपरेटर विकास कुमारसोबत प्रेमसंबंध होते. तीन महिन्यांपूर्वीही दोघांनाही लोकांनी रंगेहाथ पकडलं होतं. पण नंतर पंचायत घेऊन प्रकरण मिटवण्यात आलं. दोघेही एकमेकांना भेटणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला होता. पण पुन्हा एकदा लोकांनी त्या दोघांना गावाबाहेर भेटताना पाहिलं. यानंतर लोक संतप्त झाले. दोघांनाही पकडून मारहाण करण्यात आली आणि हॉलमध्ये बंद करण्यात आलं. नंतर गावकऱ्यांनी दोघांचंही लग्न लावून दिलं.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आता तिला तिच्या प्रियकरासोबत आणि मुलांसोबतच राहायचं आहे. तर विकासने सांगितलं की, तो साहेबपूर कमल ब्लॉक अंतर्गत डेटा ऑपरेटर आहे आणि त्याला एक मुलगा देखील आहे. त्याला त्याच्या दोन्ही पत्नीसोबत राहायचं आहे. गावकऱ्यांनी त्याला लग्न करण्यास भाग पाडलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ते याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.