कुलभूषण जाधवांची फाशी रोखण्यासाठी आईची याचिका
By admin | Published: April 26, 2017 06:06 PM2017-04-26T18:06:42+5:302017-04-26T18:15:57+5:30
भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आई अवंती जाधव यांनी पाकिस्तानकडे बुधवारी याचिका दाखल केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आई अवंती जाधव यांनी पाकिस्तानकडे बुधवारी याचिका दाखल केली आहे.
कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात इस्लामाबादमधील भारतातील दूतावासाने अवंती जाधव यांच्यावतीने पाकिस्तानमधील कोर्टात आज याचिका दाखल केली आहे. याचबरोबर कुलभूषण जाधव यांची फाशी रोखण्यासाठी भारत सरकारकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारत सरकारकडून आतापर्यंत 16 वेळा प्रयत्न केले. मात्र, पाकिस्तानने याप्रकरणी करण्यात आलेली विनंती धुडकावून लावली आहे.
कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना 3 मार्च 2016ला पाकिस्तानने बलुचिस्तानमधून अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर पाकिस्तानी आर्मी अॅक्ट(PAA)अंतर्गत हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत फील्ड जनरल कोर्ट मार्शल(FGCM)नुसार त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
#KulbhushanJadhav's mother has sought Pak govt's intervention for his release and expressed the desire to meet him: #MEA. 1/3
— Press Trust of India (@PTI_News) April 26, 2017
India has given to the Pak govt a petition by mother of retired Indian Navy officer #KulbhushanJadhav: #MEA. 2/3
— Press Trust of India (@PTI_News) April 26, 2017
India has also given the appeal of #KulbhushanJadhav's mother on behalf of her son to the appellate court: #MEA. 3/3
— Press Trust of India (@PTI_News) April 26, 2017