सासरी पाठवण्यास नकार दिल्याने माहेरच्यांना पेटवले
By admin | Published: April 16, 2015 05:26 PM2015-04-16T17:26:02+5:302015-04-16T17:26:02+5:30
लक्ष्मीच्या सासरकडील मंडळी कमला, रामलाल, रामवीर, पप्पू आणि अवतार यांनी मणियार येथे लक्ष्मीच्या घरी जात त्यांचे घर बाहेरून बंद केले व पेट्रोल टाकून जाणळ्याचा प्रयत्न केला.
Next
>ऑलाइन लोकमत
भोपाळ, दि. १६ - २२ वर्षाची महिला व तिच्या कुटुंबियांना पेटवण्याचा प्रयत्न पिडित महिलेच्या सासरच्या कुटुंबियांनी केला आहे.
सासरची मंडळी त्रास देत असल्याने लक्ष्मी ही पिडीत महिला माहेरी राहण्यास आली होती. लक्ष्मीचा पती रामलाल व त्याची आई कमला यांनी लक्ष्मीच्या आईसोबत संपर्कसाधत तिला सासरी पाठवण्यास सांगितले होते. मात्र, राठोड कुटुंबियांनी त्यांना नकार दिला होता. या गोष्टीचा राग मनात धरत लक्ष्मीच्या सासरकडील मंडळी कमला, रामलाल, रामवीर, पप्पू आणि अवतार यांनी मणियार येथे लक्ष्मीच्या घरी जात त्यांचे घर बाहेरून बंद केले व पेट्रोल टाकून जाणळ्याचा प्रयत्न केला. परंतू, राठोर कुटुंबियांचा आरडो ओरडा ऐकताच शेजा-यांनी त्यांच्या दार बाहेरून उघडले व संपूर्ण कुटुंबियांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच अग्निशमनदलाला बोलवण्यात आले.
कोतवाली येथील वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार गीता राठोर (५२) या ७० टक्के भाजल्या असून त्यांना ग्वाल्हेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, लक्ष्मीचे वडील जगदीश राठोर (५५), लक्ष्मी (२२), सरस्वती (१६), महेश (१७) यांना भोपाळ येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.