Video : घरून गेला रेशन आणायला अन् घेऊन आला सुनबाई; मग जे घडलं, ते तुम्हीच पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 10:45 PM2020-04-29T22:45:46+5:302020-04-30T00:10:49+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने लॉकडउनपूर्वीच लग्न केले होते आणि पत्नीला साहिबाबाद येथील भाड्याच्या घरात शिफ्ट केले होते.
गाझियाबाद - उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये लॉकडाउन सुरू असतानाच एक गमतीशीर घटना घडली आहे. जिल्ह्यातील साहिबाबाद भागात राहणारा एका तरुण बुधवारी रेशन आणण्यासाठी घरातून बाहेर पडला. मात्र, काही वेळानंतर जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याच्यासोबत एक तरुणीही होती. मग काय मुलासोबत सुनबाई पाहून आईचाही पारा चढला आणि तिने त्यांना घरात प्रवेशच करू दिला नाही. यानंतर हे दोघेही थेट पोलीस ठाण्यात पोहोचले.
"अम्मा मुझे लेने आई हैं..."; अखेरचा श्वास घेण्यापूर्वी असे होते इरफान यांचे शब्द
ही घटना साहिबाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. श्याम पार्कमध्ये राहणारा एक तरुण बुधवारी सकाळी रेशन आणण्यासाठी चाललो, असे सांगून घरातून बाहेर पडला. यानंतर तो थेट तीन तासांनीच घरी परतला. मात्र, यावेळी तो एकटा नव्हता. तर त्याच्यासोबत एक तरुणीही होती. आईने विचारल्यानंतर, त्याने आपण हिच्याशी मंदिरातलग्न केले आहे, असे सांगितले. यावर आई जाम भडकली आणि तिने त्यांना घरात घेतले नाही. माग काय? हे दोघेही थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. काही वेळातच तरुणाची आईही तेथे पोहोचली. तुरुणाने पोलिसांना सांगितले, की आम्ही हरिद्वार येथील मंदिरातलग्न केले. यावर पोलिसांनी दोघांनाही शांत केले. आता हे तरुण-तरुणी एका भाड्याच्या घरात राहण्यासाठी गेले आहेत.
...पण ऐकतील ते ट्रम्प कसले?; 20 वर्षं चाललेल्या व्हिएतनाम युद्धापेक्षा जास्त अमेरिकींचा बळी
Mother sent son to buy grocery, he returned with a bride. Mom didn’t allow them to enter the house, took them to police station. Couple has no proof that they got married. The priest who got them married told them he can give a certificate only after the lockdown. 😀#UP ki batein pic.twitter.com/MPQG1MQaQY
— Smita Prakash (@smitaprakash) April 29, 2020
भाड्याच्या घरात रहात होती पत्नी -
मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने लॉकडउनपूर्वीच लग्न केले होते आणि पत्नीला साहिबाबाद येथील भाड्याच्या घरात शिफ्ट केले होते. मात्र, याच काळात लॉकडाउनची घोषणा झाली. यामुळे एकटी राहणारी तरुणी कंटाळली. अखेर संबंधित तरुणाला लग्नासंदर्भात घरात सांगणे भाग पडले. लग्नाचे प्रमाणपत्र, 3 मेनंतर मिळणार असल्याचे मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले आहे.
धक्कादायक; लॉकडाउनमध्ये बाल्कनीत उभ्या असलेल्या 13 वर्षांचा मुलावर झाडली गोळी, नैरोबीतील घटना