सहा विद्यार्थ्यांच्या आई सरसावल्या; दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा हॅशटॅग ट्रेंडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 04:13 AM2020-06-14T04:13:00+5:302020-06-14T04:13:32+5:30

आयसीएसईची दहावी, बारावीची परीक्षा रद्द करा; सहा आईंनी घेतला पुढाकार; ट्विटरवर अभियान

mother of six student demands cancellation of icse 10th and 12th exam | सहा विद्यार्थ्यांच्या आई सरसावल्या; दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा हॅशटॅग ट्रेंडिंग

सहा विद्यार्थ्यांच्या आई सरसावल्या; दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा हॅशटॅग ट्रेंडिंग

Next

लातूर : आयसीएसईचे दहावी व बारावीचे राहिलेले पेपर १ ते १४ जुलै दरम्यान होणार असल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. त्यावर तीव्र नापसंती व्यक्त करीत ३० हजार पालकांनी टिष्ट्वटरवर परीक्षा रद्द करा, अशी भूमिका मांडली आहे.

शुक्रवारी सकाळी सोशल मीडियाद्वारे पालकांनी आपला विरोध दर्शविला. त्यासाठी आयसीएसई बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहा पालक आईंनी पुढाकार घेतला. त्यास ३० हजार पालकांनी समर्थन दर्शविले आहे. लॉकडाऊनमुळे आयसीएसईने १९ मार्च रोजी परीक्षा थांबविली होती. त्यामुळे दहावीचे सहा पेपर राहिले होते. विद्यार्थ्यांच्या सहा आर्इंनी एक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप करून बोर्डाने परीक्षा रद्द करावी, अशी मोहीम गुरुवारी राबविली. त्यानंतर शेकडो ग्रुप करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी टिष्ट्वटरवर मोहीम उघडून अवघ्या दीड तासांत याच विषयावर ३० हजार टिष्ट्वट करण्यात आले.

Web Title: mother of six student demands cancellation of icse 10th and 12th exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.