मदर तेरेसा होणार पाचव्या भारतीय कॅथलिक ‘संत’!
By Admin | Published: March 17, 2016 12:51 AM2016-03-17T00:51:32+5:302016-03-17T00:51:32+5:30
दीन-दु:खितांची विश्वमाता तथा उपेक्षितांची ‘आई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदर तेरेसा यांना संतपदाचा बहुमान जाहीर होताच ख्रिस्ती समाजात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
स ुद्रमार्गे शिरले होते गुजरातमध्येनवी दिल्ली : महाशिवरात्रीच्या निमित्ताने गुजरातच्या सोमनाथ मंदिरावर अतिरेकी हल्ला करण्यासाठी आलेल्या १0 पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी तीन जणांना सुरक्षा दलांनी र्कठस्नान घातले असून, अन्य सात जणांना जिवंत पकडण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी काही अतिरेकी गुजरातमार्गे भारतात शिरले असल्याची माहिती पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नसीय खान जनुजा यांनी भारताला कळवली होती. त्या माहितीच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयांना सर्वच राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यातही गुजरातचे सोमनाथ मंदिर तसेच मुंबई आणि दिल्ली हे दहशतवाद्यांचे लक्ष्य असू शकेल, हे गृहित धरून या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुजरातमध्ये तर पोलीस आणि सुरक्षा दले यांनी महाशिवरात्रीच्या आधीपासूनच दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे त्या दिवशी कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. मात्र या दहशतवाद्यांचा शोध सुरू होता.पाकिस्तानातून १0 दहशतवादी समुद्रमार्गे गुजरातमार्गे शिरल्याच्या माहितीमुळे सुरक्षा दलांनी संबंधित भागांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे १0 पैकी तीन जणांना चकमकीत ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकार्यांनी दिली. अन्य सात जण कोणत्या भागात लपले आहेत, याची माहिती आमच्याकडे असून, त्याआधारे त्यांना जिवंत पकडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. मात्र त्याहून अधिक माहिती देण्यास त्याने नकार दिला.सुरक्षेच्या कारणांमुळेच तीन दहशतवादी ठार होईपर्यंत ही माहिती जाहीर करण्यात आली नाही. उरलेले सात दहशतवादी गुजरातमध्येच आहेत की देशाच्या अन्य भागात लपलेले आहेत, याचीही माहिती देण्यात आलेली नाही. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा वा जैशै महमद या संघटनांचे असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.या घटनेनंतर तटरक्षक दलाने तसेच सुरक्षा दलांनी देशातील सर्वच समुद्र किनार्यांवर आणि गुजरात तसेच राजस्थानमध्ये आपले लक्ष केंद्रित केले आहे. तेथून आणखी अतिरेकी शिरू नयेत, यासाठी ही दक्षता घेण्यात येत आहे.