पोरा उठ रं..डोळं उघड, मुलाच्या मृतदेहाला कवटाळून आईचा आक्रोश; क्षणातच झाला ‘असा’ चमत्कार की...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 02:40 PM2021-06-17T14:40:48+5:302021-06-17T14:48:05+5:30

नातवाचा मृतदेह रात्रभर ठेवण्यासाठी बर्फ आणि सकाळी दफन करण्यासाठी मिठाची व्यवस्था करण्यात आली.

Mother was repeatedly saying to the son’s dead body get up quickly after breath started walking | पोरा उठ रं..डोळं उघड, मुलाच्या मृतदेहाला कवटाळून आईचा आक्रोश; क्षणातच झाला ‘असा’ चमत्कार की...

पोरा उठ रं..डोळं उघड, मुलाच्या मृतदेहाला कवटाळून आईचा आक्रोश; क्षणातच झाला ‘असा’ चमत्कार की...

googlenewsNext
ठळक मुद्देहितेश यांच्या मुलाला टायफॉईड झाला होता. उपचारासाठी त्याला दिल्लीला नेण्यात आलं.२६ मे रोजी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह घेऊन आम्ही बहादूरगडला परतलो.आसपासच्या लोकांनाही बातमी कळाली. सकाळी मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी गर्दी झाली

हरियाणात एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे तुमच्या मनात आजच्या युगातही चमत्कार होतात का? असा प्रश्न निर्माण होईल. येथे आईच्या प्रेमानं सगळ्यांना आश्चर्यचकीत केले आहे. २० दिवसांपूर्वी ६ वर्षाच्या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या कुटुंबाने त्यांचे अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मुलाचा मृतदेह डोळ्यासमोर पाहून आईनं हंबरडा फोडला. मुलाला कुशीत घेऊन पोरा उठं रं..पोरा उठं डोळं उघड..अशी विनवणी करू लागली त्यानंतर जे काही झालं त्याने सगळ्यांना धक्काच बसला.

या मुलाच्या शरीरात हालचाल होऊ लागली. त्यानंतर तातडीने त्याच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले. मंगळवारी रोहतकच्या हॉस्पिटलमधून तो उपचार घेऊन पुन्हा हसत-खेळत घरी परतला आहे. ही घटना हरियाणाच्या बहादूरगड परिसरातील आहे. याठिकाणी राहणाऱ्या हितेश आणि त्यांची पत्नी जान्हवी यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला टायफॉईड झाला होता. त्याच्या उपचारासाठी त्याला दिल्लीला नेण्यात आलं. २६ मे रोजी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह घेऊन आम्ही बहादूरगडला परतलो.

मृतदेह ठेवण्यासाठी बर्फ आणि अंत्यसंस्कारासाठी मिठ मागवलं

मुलाचे आजोबा विजय शर्मा म्हणाले की, नातवाचा मृतदेह रात्रभर ठेवण्यासाठी बर्फ आणि सकाळी दफन करण्यासाठी मिठाची व्यवस्था करण्यात आली. आसपासच्या लोकांनाही बातमी कळाली. सकाळी मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी गर्दी झाली. मुलाची आई जान्हवी आणि आजी अन्नू या धायमोकळून रडत होत्या. वारंवार मुलाच्या मृतदेहाला कवटाळून परत ये असं हंबरडा फोडत होत्या. काही वेळात मृतदेहाच्या शरीरात हालचाल जाणवली. वडील हितेश यांनी मुलाच्या चेहऱ्यावरील चादर हटवली आणि त्याला तोंडातून श्वास देऊ लागले. शेजारील सुनीलने मुलाची छाती दाबण्यास सुरुवात केली आणि अचानक मुलानं तोंडातून श्वास देणाऱ्या वडिलांच्या होटावर दाताने पकडलं.

श्वास परतल्यानंतर केवळ १५ टक्के जगण्याची आशा होती  

या घटनेनंतर २६ मे रात्रीच त्याला रोहतकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मुलाच्या वाचण्याचे केवळ १५ टक्के चान्स आहेत असं डॉक्टर म्हणाले. उपचार सुरू झाले. वेगाने मुलगा बरा होऊ लागला. त्यानंतर आता पूर्णपणे बरा होऊन मंगळवारी तो त्याच्या घरी परतला आहे.

गावात आनंदाचं वातावरण

मुलाच्या दाताने वडील हितेशच्या होठांवर जखम झाली होती. मात्र ही जखम संपूर्ण गावासाठी आनंद घेऊन आली. मुलाचे आजोबा विजय शर्मा तर हा चमत्कार असल्याचं सांगत आहेत. गावात घडलेल्या या घटनेमुळे आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

Web Title: Mother was repeatedly saying to the son’s dead body get up quickly after breath started walking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.