मातोरीतील महिलेचा अतिसाराने मृत्यू?
By admin | Published: June 3, 2016 11:19 PM2016-06-03T23:19:09+5:302016-06-03T23:55:04+5:30
नाशिक : मातोरी येथील यमुना पांडुरंग रेंजर (६०) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़ २) रात्रीच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली़ दूषित पाण्यामुळे या महिलेस अतिसाराची लागण झाली व त्यातच तिचा मृत्यू झाल्याची चर्चा मातोरी ग्रामस्थांमध्ये आहे़ मयत महिला ही मातोरी गावामध्ये भाडेतत्त्वावर राहत होती़ या महिलेस उलट्या व जुलाब होत असल्याने तिला गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ रात्री बारा वाजेच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या महिलेचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नसून त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे़ (प्रतिनिधी)