मदर्स डे : 35 टक्के महिलांना नकोय दुसरे अपत्य
By admin | Published: May 14, 2017 08:38 AM2017-05-14T08:38:54+5:302017-05-14T08:38:54+5:30
बदलत्या जीवनशैलीनुसार आपले विचारही बदलत आहेत. कुटुंब नियोजनाला आधी भारतात जास्त महत्व दिलं जात नव्हतं तर आज कुटुंब नियोजनाला अत्यंत महत्वाचं मानलं जातं.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - बदलत्या जीवनशैलीनुसार आपले विचारही बदलत आहेत. कुटुंब नियोजनाला आधी भारतात जास्त महत्व दिलं जात नव्हतं तर आज कुटुंब नियोजनाला अत्यंत महत्वाचं मानलं जातं. "मदर्स डे"निमित्त असोचेमच्या सामाजिक विभागाने देशभरातील महत्वाच्या दहा शहरातून महिलांचे सर्वेक्षण केले.
या सर्वेक्षणानुसार भारतातील शहरी भागात काम करणाऱ्या 35 टक्के काम करणाऱ्या महिलांना दुसरं मुल नकोय. कामासोबत इतर व्यापामुळे दुसऱ्या मुलासाठी वेळ देता येत नसल्याचे कारण त्यांच्याकडून देण्यात आलं आहे. तर काहींना एकाच मुलावर लक्ष केंद्रीत करता यावं म्हणून दुसरे अपत्य नको आहे.
अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लखनऊ आणि मुंबईतील जवळपास 1500 महिलांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी लग्नसंबंधातील ताणतणाव, कामाच्या ठिकाणचा वाढता तणाव, मुलांच्या संगोपनासाठीचा खर्च ही एकाच अपत्यावर थांबण्यामागची मुख्य कारणे असल्याचं समोर आलं आहे. तर दुसऱ्या बाळंतपणासाठी घेतलेल्या रजेमुळे आपल्या पदोन्नतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही जोखीम घेऊ शकत नसल्याचे म्हटले.
काहींना त्यांच्या जोडीदाराकडून दुसऱ्या मुलाबाबत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
हल्ली मोठ्या शहरांमध्ये छोटे कुटुंब असल्याने तसेच नोकरीनिमित्त घराबाहेर असलेली आई आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही, हे प्रमाण शहरांत खूप आहे.