हृदयस्पर्शी! प्रियजनांनी नाकारलं पण 'तिने' आपलंस केलं; स्वत:चं मूल नाही, झाली 169 मुलांची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 03:10 PM2023-05-14T15:10:54+5:302023-05-14T15:12:28+5:30

आश्रमात निराधार मातेच्या मुलांची स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेत आहे. मुलांच्या जेवणाची, शिक्षणाची काळजी घेतली आहे.

mothers day special dr madhuri bhardwaj is mothering 169 children read inspiring story | हृदयस्पर्शी! प्रियजनांनी नाकारलं पण 'तिने' आपलंस केलं; स्वत:चं मूल नाही, झाली 169 मुलांची आई

हृदयस्पर्शी! प्रियजनांनी नाकारलं पण 'तिने' आपलंस केलं; स्वत:चं मूल नाही, झाली 169 मुलांची आई

googlenewsNext

"आई" हा असा शब्द आहे की ऐकून सर्व त्रास दूर होतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईची भूमिका महत्त्वाची असते. राजस्थानमधील भरतपूरमध्ये एक अशी आई आहे जिला स्वतःचं मूल नाही, तरीही ती 169 मुलांची आई आहे. ही आई म्हणजे अपना घर आश्रमाच्या संचालिका डॉ. माधुरी भारद्वाज. ज्यांच्या आश्रमात त्या निराधार मातेच्या मुलांची स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेत आहे. मुलांच्या जेवणाची, शिक्षणाची काळजी घेतली आहे. या मुलांची काळजी घेण्यासाठी आश्रमात राहणाऱ्या महिलांसोबतच बाहेरगावच्या महिलांचाही सहभाग असतो.

बढेरा गावात असलेल्या अपना घर आश्रमाच्या संचालिका डॉ. माधुरी भारद्वाज यांनी सांगितले की, या आश्रमात निराधार लोक राहतात. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. यातील बहुतांश महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे त्या आपल्या मुलांची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळेच या मुलांच्या देखभालीसाठी आश्रमात स्वतंत्र घर आहे. ज्यामध्ये लहान बाळांपासून ते 18 वर्षांपर्यंतची मुले आहेत. सध्या या घरात 169 मुलं राहतात. मी स्वतः त्यांची काळजी घेते आणि माझ्याशिवाय आश्रमात राहणाऱ्या महिलांसह बाहेरून आलेल्या महिलाही काम करतात.

मला स्वतःची मुलं नसली तरी ही मुलं मला कधीच असं वाटू देत नाहीत की मला मुलं नाहीत. ही मुलं मला आई आणि पतीला बाब म्हणून हाक मारतात तेव्हा आमच्यासाठी शब्दच नसतात. जेवण आणि खेळापासून ते शिक्षणापर्यंत आम्ही या मुलांची काळजी घेतली आहे. त्यांनी सांगितले की, आई हा असा शब्द आहे जो प्रत्येक स्त्रीला सन्मान देतो. मुलाच्या सुरक्षिततेपासून प्रत्येक गरजा पूर्ण करणारी आई असते. आई म्हणजे मुलाचे संपूर्ण जग. 

5-7 वर्षांच्या मुलासाठी आई आवश्यक आहे कारण आई मुलाला संवेदनशील करते आणि शक्ती प्रदान करते. डॉ. माधुरी यांनी सांगितले की, आश्रमात राहणारी आई जेव्हा निरोगी होते, तेव्हा तिला आणि तिच्या मुलांना दिलेल्या पत्त्यावर माहिती घेऊन पाठवले जाते. या आश्रमात बिहार, ओडिशा, यूपी, मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब, बंगाल, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी भागातील मुले राहतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: mothers day special dr madhuri bhardwaj is mothering 169 children read inspiring story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.