मोटरस्टॅण्ड -घोरपड उड्डाण पुलासाठी निधी मंजूर

By admin | Published: July 26, 2015 11:38 PM2015-07-26T23:38:22+5:302015-07-26T23:38:22+5:30

मोटरस्टॅण्ड -घोरपड उड्डाण पुलासाठी निधी मंजूर

Motorsand-Ghorpad flyover bridge fund sanctioned | मोटरस्टॅण्ड -घोरपड उड्डाण पुलासाठी निधी मंजूर

मोटरस्टॅण्ड -घोरपड उड्डाण पुलासाठी निधी मंजूर

Next
टरस्टॅण्ड -घोरपड उड्डाण पुलासाठी निधी मंजूर
कामठीवासीयांना दिलासा : पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
कामठी : स्थानिक मोटरस्टॅण्ड ते घोरपड मार्गावर उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच उड्डाण पुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या उड्डाण पुलाचा मार्ग सुकर झाल्याने कामठीवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कामठी शहराची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. शहरातील बहुतांश नागरिक नवीन कामठी, घोरपड रोड, रविदासनगर परिसरात वास्तव्यास आहेत. नवीन कामठी, घोरपड येथे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे लाईन आहे. या रेल्वे मार्गावर रेल्वे गाड्याही मोठ्या प्रमाणात धावत असल्याने रमानगर रेल्वे फाटक सतत बंद असते. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या समस्येसाठी नागरिकांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी उड्डाण पुलाचा प्रस्ताव तयार करुन मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देत ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या उड्डाण पुलाच्या निर्मितीमुळे घोरपड, लिहीगाव, पवनगाव, धारगाव, शिरपूर, महालगाव, नवीन कामठी परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी सोयीचे होणार आहे. मोटरस्टॅण्ड-घोरपड उड्डाण पुलामुळे रमानगर रेल्वे फाटकाची समस्यादेखील सुटणार आहे. या निधीसाठी नागरिकांनी पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Motorsand-Ghorpad flyover bridge fund sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.