एव्हरेस्ट सर करताना खोल बर्फाळ दरीत पडला; बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 02:33 PM2023-06-14T14:33:13+5:302023-06-14T17:16:31+5:30

एव्हरेस्ट हा असा पर्वत आहे, जिथे अनुभवी गिर्यारोहकही कधीकधी अडचणीत अडकतात.

Mount everest, A Sherpa fell into a deep icy valley while climbing Everest; Watch the thrilling video of the rescue | एव्हरेस्ट सर करताना खोल बर्फाळ दरीत पडला; बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ पाहा...

एव्हरेस्ट सर करताना खोल बर्फाळ दरीत पडला; बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ पाहा...

googlenewsNext


जगात चढाईसाठी सर्वात अवघड असणारा माउंट एव्हरेट्स पर्वत अनेकांनी सर केला आहे. चढाईसाठी खूप अवघड असला तरीही, अनेकजण त्यांचे कौशल्य, तंत्र आणि योग्य मार्गदर्शनाखाली एव्हरेस्टवर चढाई करण्यात यशस्वी होतात. पण, या चढाईदरम्यान अनेकदा अपघातही झाले आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता पुन्हा एकदा एव्हरेस्टवर अपघात झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय, ज्यात दोन खडकांमध्ये शेर्पा अडकल्याचे दिसत आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितोत की, शेर्पा(स्थानिक लोक/निवासी) अनुभवी गिर्यारोहकांपैकी आहेत. त्यांना एव्हरेस्ट सर करण्याचा अनुभव आहे, पण यावेळेस त्यांचाही अंदाज चुकला. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये शेर्पा माउंट एव्हरेस्टवर चढाई करताना एका खोल दरीत अडकलेला दिसत आहे. ट्विटरवर व्हायरल व्हिडिओमध्ये शेर्पाला वाचवतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी ही दरी किती खोल आहे, हेदेखील यात दाखवले आहे. 

गेसमन तमांग नावाच्या कुशल गिर्यारोहक आणि बचावकर्त्याने व्हिडिओ पोस्ट केला आहे. शेअर केल्यापासून व्हिडिओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि 3500 हून अधिक लाइक्स आले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही लोक सुपर ह्युमन आहात.' तर दुसऱ्याने लिहिले, 'तुम्ही उत्कृष्ट काम करता.' चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनीही हा व्हिडिओ पोस्ट करून या लोकांचे कौतुक केले आहे.

Web Title: Mount everest, A Sherpa fell into a deep icy valley while climbing Everest; Watch the thrilling video of the rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.