आंदोलन फसले, हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

By admin | Published: October 18, 2015 03:41 PM2015-10-18T15:41:19+5:302015-10-18T15:41:40+5:30

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना उधळून लावण्याचा हार्दिक पटेलचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. आंदोलनासाठी निघालेल्या हार्दिकला राजकोट - जामनगर महामार्गावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले.

Movement crops, Hardik Patel police custody | आंदोलन फसले, हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

आंदोलन फसले, हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

Next

ऑनलाइन लोकमत

राजकोट, दि. १८ - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना उधळून लावण्याचा हार्दिक पटेलचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. आंदोलनासाठी निघालेल्या हार्दिकला राजकोट - जामनगर महामार्गावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले असून हार्दिकला ताब्यात घेतल्याने या सामन्यातील विघ्न टळले आहे.

पटेल समाजाच्या लोकांना सामन्याची तिकीटे दिली नाहीत असा आरोप करत पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेलने राजकोट येथे होणारा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना उधळून लावण्याची धकमी दिली होती. यानंतर शनिवारी रात्रीपासून राजकोटमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून पोलिसांचा फौजफाटाही स्टेडियम परिसरात तैनात कऱण्यात आला आहे. रविवारी सकाळी आंदोलनापूर्वी पोलिसांनी हार्दिकला ताब्यात घेतले.  

Web Title: Movement crops, Hardik Patel police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.