मिरी गटाच्या पोटनिवडणुकीसाठी हालचाली
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:29+5:302014-12-20T22:27:29+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील जिल्हा परिषदेच्या मिरी गटाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.
Next
अ मदनगर : जिल्हा तालीम संघ व कै़ पै़ छबू लांडगे प्रतिष्ठानच्यावतीने दि़ २५ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार्या महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून, क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे़ यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अन्न व नागरी विकास मंत्री गिरीश बापट, गृहराज्यमंत्री राम शिंदे, राष्ट्रीय खेळाडू सुशीलकुमार आदी उपस्थित राहणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक वैभव लांडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ केसरी किताबासाठी अंतिम लढत गादीवर होणार असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व तयारी करण्यात आली आहे़ राज्यभरातून येणारे मल्ल, पंच, कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे़ स्पर्धेचे मुख्य ठिकाण असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल येथे आखाड्याचे काम पूर्ण झाले असून, प्रमुख पाहुण्यांना बसण्यासाठी तीन व्यासपीठ उभारण्यात येत आहेत़ पे्रक्षकांना कुस्तीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मैदानावर सहा एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहे़ स्पर्धेदरम्यान कुठलाही वाद होऊ नये, यासाठी आयोजकांच्यावतीने सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचे लांडगे म्हणाले़ यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, ॲड़ अभिषेक भगत, विलास चव्हाण, अंजली वल्लाकटी आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)....महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील सहभागावरून पुणे येथील दोन संघात सुरू असलेला वाद तसेच नगर येथे २०१३ झालेल्या कुस्ती स्पर्धेतील वाद लक्षात घेता आयोजकांनी कडक सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे़ स्पर्धेतील पदाधिकारी, मल्ल, पंच, स्वयंसेवक व पत्रकारांना ओळखपत्र देण्यात येणार आहेत़ प्रेक्षकांना मैदानात दोन प्रवेशद्वारातूनच प्रवेश देण्यात येणार आहे़ .....संपूर्ण मैदानात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत़ तसेच १०० स्वयंसेवक, ४० बाऊंसर्स, ३० सिक्युरिटी गार्डस् आणि १२५ पोलिसांचा ताफा स्पर्धेच्या ठिकाणी राहणार आहे़ स्पर्धेसाठी २४ तारखेलाच मल्ल येणार असल्याने त्या दिवसांपासूनच सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे़ .....टीप-सदर बातमी नगरला हॅलो पानात घेतली आहे. इतर आवृत्तीसाठी पाठवित आहे.