वाढवलेली फी मागे न घेतल्यास आंदोलन
By admin | Published: February 20, 2016 12:06 AM2016-02-20T00:06:58+5:302016-02-20T00:06:58+5:30
जळगाव: टॅक्सी व रिक्षा यांच्या परवान्यासाठी लागणार्या शुल्कात शासनाने वाढ केली असून तसा अध्यादेश जारी केला आहे. ही वाढ शासनाने त्वरीत मागे घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एकता जळगाव टॅक्सी रिक्षा युनियने दिला आहे. जिल्हाध्यक्ष रज्जाक खान यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी युनियनच्या पदाधिकार्यांची बैठक झाली.
Next
ज गाव: टॅक्सी व रिक्षा यांच्या परवान्यासाठी लागणार्या शुल्कात शासनाने वाढ केली असून तसा अध्यादेश जारी केला आहे. ही वाढ शासनाने त्वरीत मागे घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एकता जळगाव टॅक्सी रिक्षा युनियने दिला आहे. जिल्हाध्यक्ष रज्जाक खान यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी युनियनच्या पदाधिकार्यांची बैठक झाली.ऑटो रिक्षा,कालीपिली टॅक्सी,मॅक्सी कॅब, ट्रकचा तात्पुरता परवाना नुतनीकरणासाठी दोनशे रुपये शुल्क होते, मात्र नवीन अध्यादेशानुसार आता त्यासाठी एक हजार रुपये लागणार आहेत. प्रत्येक वाहनाला लागणारा तात्पुरता परवानाही दोनशेवरुन एक हजार रुपये करण्यात आला आहे. राष्ट्रीय परवाना व नुतनीकरणाचेही एक हजार रुपये शुल्क करण्यात आले आहे. ऑटो रिक्षा परवाना जारी करण्यासाठी मुंबई महानगर वगळता दहा हजार तर टॅक्सीसाठी वीस हजार रुपये शुल्क लागणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा युनियने निषेध केला आहे. बैठकीला पारोळा युनियनचे अध्यक्ष मधुकर कासार, अमळनेर टॅक्सी युनियनचे अध्यक्ष बंडू केळकर, महासचिव मधुकर चौधरी व कैलास माळी उपस्थित होते.