न्यायमूर्तींमधील मतभेद मिटविण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 03:28 AM2018-01-15T03:28:32+5:302018-01-15T03:28:44+5:30
र ज्येष्ठतम न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतल्याने, उघड झालेले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमधील मतभेद दूर
नवी दिल्ली : चार ज्येष्ठतम न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतल्याने, उघड झालेले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमधील मतभेद दूर करण्यासाठी व त्यातून उद््भवलेली परिस्थिती निवळण्यासाठी रविवारी दिवसभर अनेक हालचाली झाल्या. या जाहीर वादानंतर सर्व न्यायाधीश सोमवारी प्रथमच पुन्हा न्यायालयांचे कामकाज सुरू करणार आहेत.
बार कौन्सिल आॅफ इंडियाने घेतलेल्या निर्णयानुसार त्यांचे अध्यक्ष अॅड. मन्न
कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ७ सदस्यांच्या शिष्टमंडळाने शिष्टाईचे प्रयत्न सुरू केले. मतभेद उघड करणाºया ४ न्यायाधीशांखेरीज इतरही न्यायाधीशांना व सरन्यायाधीशांना भेटून या मंडळींनी मतभेद आपसात चर्चेने सोडविण्याचा आग्रह केला, असे समजते. लवकरच सर्व काही ठाकठीक होईल, असा विश्वास कौन्सिलला वाटतो. या घटनेकडे न्यायमूर्ती संस्थेत निर्माण झालेला पेचप्रसंग या दृष्टीने पाहात नाहीत, असेही कौन्सिलच्या शिष्टमंडळास जाणवले.
सूत्रांनुसार, या शिष्टमंडळाने सर्वप्रथम ‘बंडखोरां’चे नेतृत्त्व करणाºया न्या. जस्ती चेलमेश्वर यांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली. न्या. रंजन गोगोई, न्या. मदन बी. लोकूर व न्या. कुरियन जोसेफ दिल्लीत परतल्यानंतर, रात्रीपर्यंत त्यांनाही भेटण्याची शिष्टमंडळाची योजना होती. याखेरीज शिष्टमंडळ न्या. आर. के. अगरवाल व न्या. अजय खानविलकर यांनाही भेटल्याचे समजते. सरतेशेवटी सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांनाही भेटण्याचा ते प्रयत्न करणार होते.